August 15, 2025 1:47 PM

views 19

उत्तम शिक्षण आणि मनुष्यबळ विकासाच्या जोरावर महाराष्ट्र देशाच्या विकासाचे नेतृत्व करेल, असा मुख्यमंत्र्यांना विश्वास

देशाच्या ७९व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त राज्यात मंत्रालय इथं मुख्य शासकीय सोहळा झाला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना तसंच शहीद जवानांनाही आदरांजली वाहिली. जगातली सर्वोत्तम उत्पादनं भारतात तयार करण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं ते उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले. स्वदेशी उत्पादनांचा वापर करून आत्मनिर्भर भारताला बळकटी दिली जात आहे,  देशात येत असलेल्या परदेशी गुंतवण...

August 15, 2024 7:00 PM

views 19

समान नागरी कायद्यावर देशात व्यापक चर्चेची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून व्यक्त

देशातले १४० कोटी नागरिक एकजुटीने वागले तर, प्रत्येक आव्हानावर मात करत २०४७ पर्यंत विकसित राष्ट्राचं स्वप्न साकार होऊ शकेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त सलग ११व्यांदा मोदी यांनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला, त्यानंतर ते देशाला संबोधित करत होते. विकसित भारतात सर्वसामान्यांच्या जगण्यात सरकारचा कमीत कमी हस्तक्षेप असावा, आणि लोकांना गरज असेल तेव्हाच सरकारने पुढाकार घ्यावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.   समान नागरी कायद्याची आवश्यकता असल्याचं मत सर्व...