January 16, 2025 3:28 PM

views 31

धुळे जिल्ह्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधल्या हमाल मापाडी कामगारांनी आजपासून सुरू केला बेमुदत संप

धुळे जिल्ह्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधल्या हमाल मापाडी कामगारांनी आजपासून बेमुदत संप सुरू केला आहे. मजुरीत वाढ करावी अशी मागणी कामगारांनी केली आहे. जोपर्यंत मजुरी वाढ होत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही असा इशारा कामगारांनी दिला आहे.  

November 9, 2024 10:43 AM

views 22

महायुती सरकार वंचितांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असल्याची प्रधानमंत्र्यांची धुळ्यातील सभेत ग्वाही

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांचा जोरदार प्रचार सुरू असून दिग्गज नेत्यांच्या जाहीर सभांमधून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. देशात कॉँग्रेस जाती विभाजनाचा धोकादायक खेळ खेळत असल्याची घणाघाती टीका भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल धुळे इथल्या प्रचार सभेत केली. एनडीए सरकार आणि राज्यातील महायुती सरकार वंचितांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. त्यानंतर नाशिक इथंही पंतप्रधानांची सभा झाली. उज्ज्वला योजना, हर घर जल योजना, प...

September 27, 2024 11:05 AM

views 23

राज्यातल्या विविध धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु

लातूर जिल्ह्यात मांजरा धरणाच्या सहा दरवाजातून तीन हजार ४९४ घनफूट प्रतिसेकंद वेगानं तर रेणापूर मध्यम प्रकल्पाचे ४ दरवाजे १० सेंटीमीटरने उघडून, नदीपात्रात एक हजार २५८ घनफुट प्रतिसेकंद विसर्ग सुरू आहे.  लातूर-धाराशिव सीमेवर माकणी इथल्या निम्न तेरणा प्रकल्पाचे आठ दरवाजे काल बंद करण्यात आले, सध्या सहा दरवाजातून दोन हजार २९० घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. धुळे जिल्ह्यातील पांझरा नदीवरील अक्कलपाडा मध्यम प्रकल्पाचे 7 दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले असून 8 हजार 123 क्यूसेक विसर्ग नदीपात्...

June 14, 2024 6:33 PM

views 53

धुळे शहरात माजी आमदार अनिल गोटे यांचं बेमुदत उपोषण आंदोलन

धुळे शहरात प्रस्तावित नविन रस्ता तयार करण्याच्या कामात अडथळा आणणार्‍या यंत्रणेविरोधात माजी आमदार अनिल गोटे यांनी आज बेमुदत उपोषण आंदोलन सुरु केलं. धुळे शहरातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन ते कृषी महाविद्यालयपर्यंत रस्ता रुंदीकरण करण्याच्या आणि अधिकरणाच्या कामासाठी ४२ कोटींचा निधी देण्यात आला आहे. मात्र, कृषी महाविद्यालयाच्या जागेचं अधिग्रहण करण्यात अडथळे आणले जात आहेत. काही खाजगी शेत जमीनीही अधिग्रहीत करण्यात येणार आहेत, त्यालाही प्रशासनाकडून सहकार्य मिळत नाही यामुळे रस्त्याचे काम र...