April 15, 2025 11:06 AM April 15, 2025 11:06 AM

views 3

नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांत आज अवकाळी पावसाची शक्यता

मध्य महाराष्ट्रात काल तुरळक ठिकाणी गारांचा पाऊस पडला. मराठवाड्यातही काही ठिकाणी पाऊस झाला. नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांत आजही अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान, राज्यात आज सर्वात जास्त ४२ पूर्णांक ४ अंश सेल्सिअल तापमान अकोला इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात धाराशिव इथं ३९ पूर्णांक सहा, तर छत्रपती संभाजीनगर आणि परभणी इथं सरासरी ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.  

April 5, 2025 8:37 AM April 5, 2025 8:37 AM

views 9

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध कार्यक्रमांच्या अंमलबजावणीत धाराशिव जिल्ह्याला सहा राज्यस्तरीय पुरस्कार

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध कार्यक्रमांच्या अंमलबजावणीत धाराशिव जिल्ह्याला सहा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाले आहेत. जागतिक आरोग्य दिनी म्हणजे येत्या 7 एप्रिल रोजी मुंबईत हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.  प्रजनन आणि बाल आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत पाच वर्षात सातत्याने बालमृत्यू कमी करणारा जिल्हा म्हणून धाराशिव जिल्ह्याला राज्यस्तरीय प्रथम क्रमांक जाहीर झाला आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कामाच्या वार्षिक मूल्यांकनात धाराशिव जिल्हा राज्यात दुसऱ्या स्थानी तर राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार...

February 7, 2025 11:32 AM February 7, 2025 11:32 AM

views 15

महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी आपली प्रगती करून आत्मनिर्भर व्हावं – प्रताप सरनाईक

धाराशिव इथं महाराष्ट्र जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद अभियानाच्या महिलांनी उत्पादित केलेल्या महिला बचत गट उत्पादित वस्तूंच्या प्रदर्शनाचं उद्घाटन काल पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून झालं. महिला बचत गटाच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या महिलांनी आपली प्रगती करून आत्मनिर्भर व्हावं, असं आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केलं. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यावेळी उपस्थित होते. या प्रदर्शनाबद्दल माहिती देताना ते म्हणाले: ‘‘आमच्याकडे याठिकाणी आज दी...

January 13, 2025 9:41 AM January 13, 2025 9:41 AM

views 20

प्रा.डॉ.जयकुमार शामराज यांना भारत सरकारचे पेटंट मंजूर

धाराशिव इथल्या व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालयातले प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. जयकुमार शामराज यांना भारत सरकारचं पेटंट मंजूर झालं आहे. जलचर प्रजाती नियंत्रण पद्धतीच्या उपकरणासाठी हे पेटंट मंजूर करण्यात आलं. या उपकरणाद्वारे मत्स्यपालानातील पाण्याची गुणवत्ता आणि प्रजातीचं आरोग्य, याचं निरीक्षण करता येतं.

November 10, 2024 9:55 AM November 10, 2024 9:55 AM

views 17

धाराशिव येथील वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा मंजूर

धाराशिव इथल्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील मोक्याची ३१ एकर जागा मंजूर करण्यात आली आहे. याठिकाणी ३०० तज्ञ डॉक्टर उपलब्ध असलेले सुसज्ज आणि सर्वात मोठे वैद्यकीय संकुल उभारण्याचं काम हाती घेणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

November 6, 2024 9:08 AM November 6, 2024 9:08 AM

views 19

श्री संत गोरोबा काका कुंभार यांच्या पालखीचं धाराशिवमध्ये मोठ्या भक्तीभावानं स्वागत

धाराशिव तालुक्यातील तेर इथल्या श्री संत गोरोबा काका कुंभार यांच्या पालखीचं काल धाराशिवमध्ये मोठ्या भक्तीभावानं स्वागत करण्यात आलं. ही पालखी कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी ही पालखी तेरहून निघून कार्तिकी एकादशीला पंढरपुरात पोहोचते.  

October 18, 2024 7:18 PM October 18, 2024 7:18 PM

views 12

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धाराशिव शाखेची अवैध मद्य निर्मिती, वाहतूक तसच विक्री विरुद्ध कारवाई

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या  धाराशिव शाखेनं अवैध मद्य निर्मिती, वाहतूक तसंच  विक्री विरुद्ध कारवाई करून  जिल्ह्यातल्या  विविध ठिकाणांवरून   15 लाख रुपये किमतीचा  मुद्देमाल केला आहे. १ ऑक्टोबरपासून जिल्ह्यात विविध ठिकाणी 88 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  कर्नाटक राज्याच्या सिमेवरच्या  तलमोड इथल्या तपासणी नाक्यावर येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्याबाबत, सूचना देण्यात आल्या आहेत.

July 22, 2024 8:39 PM July 22, 2024 8:39 PM

views 11

धाराशिव इथं दोन दिवसीय मल्टीमीडिया प्रदर्शन

नव्या भारतीय फौजदारी कायद्यांची माहिती लोकांना व्हावी, यासाठी केंद्रीय संचार ब्यूरो सोलापूर आणि पोलीस अधिक्षक धाराशिव यांच्या सयुंक्त विद्यमाने उद्यापासून धाराशिव इथं दोन दिवसीय मल्टीमीडिया प्रदर्शन आयोजित केलं आहे. या प्रदर्शनात नवीन फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी, या कायद्यांमधली नवीन कलमं आणि त्यांची कार्यपद्धती, ई-एफ आय आर, योग्य वेळेत न्याय, तंत्रज्ञानाचा वापर, न्यायाधीशाशी संबधित तरतुदी, काही महत्वाच्या गुन्ह्यांसाठी शिक्षेत वाढ, तसंच आणि नवीन कायद्याविषयीचे गैरसमज आणि वस्तुस्थिती आदी विषया...

July 4, 2024 5:06 PM July 4, 2024 5:06 PM

views 23

नीती आयोगाच्या संपूर्णता अभियानाला देशभरात प्रारंभ

नीती आयोग ४ जुलै ते ३० सप्टेंबर दरम्यान संपूर्णता अभियान राबवणार आहे. या अभियानात देशातल्या ५०० तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. या अभियानामार्फत गरोदर मातांची तपासणी, उच्च रक्तदाब आणि मधुमेह तपासणी, गरोदर मातांना पोषण आहार, मृदा आरोग्य पत्रिका आणि स्वयंसहाय्यता गटांना खेळतं भांडवल देण्यात येणार आहे. महाराष्ट्रात अमरावती, बीड, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, जालना, नंदुरबार, हिंगोली, नाशिक, धाराशिव, पालघर, सोलापूर, वाशिम, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा या अभियानात समावेश झाला आहे.यवतमाळ जिल्ह्या...

July 4, 2024 5:04 PM July 4, 2024 5:04 PM

views 18

केंद्र सरकारच्या नीती आयोगानं राबवलेल्या संपूर्णता अभियानाला आज नांदेड इथं सुरुवात

केंद्र सरकारच्या नीती आयोगानं राबवलेल्या संपूर्णता अभियानाला आज महाराष्ट्रातल्या नांदेड इथं सुरुवात होत आहे. तर धाराशिव जिल्ह्यातल्या परंडा तालुक्यात उद्या या अभियानाला सुरुवात होणार आहे. या अभियानात देशातल्या ५०० तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. या अभियानामार्फत जुलै ते सप्टेंबर या कालावधीत गरोदर मातांची तपासणी, उच्च रक्तदाब आणि मधुमेह तपासणी, गरोदर मातांना पोषण आहार, मृदा आरोग्य पत्रिका आणि स्वयंसहाय्यता गटांना खेळतं भांडवल देण्यात येणार आहे. महाराष्ट्रात अमरावती, बीड, चंद्रपूर, गडचिरोली, न...