June 14, 2024 7:23 PM June 14, 2024 7:23 PM
29
नीट ची परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींच्या हिताला धक्का पोहोचणार नाही – धर्मेंद्र प्रधान
नीट ची परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थीच्या हिताला धक्का पोहोचणार नाही याची काळजी केंद्र सरकार घेईल, असं आश्वासन आज केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिलं. विद्यार्थ्यांच्या समस्या समभावाने आणि सुयोग्य पद्धतीने सोडवू असं ते म्हणाले. सध्या हे प्रकरण न्याय प्रविष्ठ असून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशनानुसार केंद्र सरकार कार्यवाही करेल असंही ते म्हणाले. दरम्यान, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सरकारवर कडक शब्दात टीका केली आहे. २४ लक्ष विद्यार्थ्यांच्या आशा सरकारनं धुळीला मिळवल्या...