July 9, 2024 10:56 AM July 9, 2024 10:56 AM
12
युक्रेन आणि पोलंड यांच्यात द्विपक्षीय सुरक्षा करार
युक्रेन आणि पोलंड यांच्यात द्विपक्षीय सुरक्षा करार झाला आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की आणि पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांनी वॉर्सामध्ये काल करारावर सह्या केल्या. वॉशिंग्टनमध्ये आजपासून सुरू होणाऱ्या उत्तर अटलांटिक करार संघटना म्हणजे नाटोच्या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर हा करार महत्त्वाचा मानला जात आहे. या कराराअंतर्गत पोलंड हवाई संरक्षण क्षेत्रात युक्रेनला सहकार्य करणार आहे. ऊर्जा सुरक्षा आणि पुनर्बांधणीमध्येही पोलंड मदत करणार आहे.