July 24, 2024 7:39 PM July 24, 2024 7:39 PM

views 10

आपण कधीही द्वेषभावनेनं राजकारण करत नसल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांचं स्पष्टीकरण

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी वसुली प्रकरणात न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल झाला होता, तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर होतं, असं सांगत आपण कधीही द्वेषभावनेनं राजकारण करत नसल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी स्पष्ट केलं. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते.   देशमुख गृहमंत्री असताना विरोधी पक्षात असणाऱ्या गिरीश महाजन यांच्यावर मोक्का लावण्यासाठी देशमुख यांनी कसा दबाव आणला होता त्याचे ऑडिओ पुरावे आपण दिले असून या संदर्भात सीबीआयने न्यायालयात आरोपपत्र दा...

July 2, 2024 6:49 PM July 2, 2024 6:49 PM

views 16

सभागृहात आक्षेपार्ह शब्द वापरल्याप्रकरणी विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ५ दिवसांसाठी निलंबित

सभागृहात आक्षेपार्ह शब्द वापरल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं पाच दिवसांसाठी निलंबन करण्याचा ठराव आज विधानपरिषदेत आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आला. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा ठराव मांडला. यासंदर्भात विरोधकांची बाजू ऐकून घ्यावी, असा आग्रह विरोधी पक्षांनी केला, मात्र अशा प्रकारच्या ठरावांवर कधीही चर्चा होत नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस म्हणाले. यावर विरोधकांनी हौद्यात उतरून उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात घोषणा दिल्या आणि सभात्याग केला. य...

June 26, 2024 8:17 PM June 26, 2024 8:17 PM

views 18

राज्याचा आगामी अर्थसंकल्प शेतकरी, महिला, युवक यांच्यासह सर्व जनतेच्या भल्याचा असेल असा मुख्यमंत्र्यांचा विश्वास

राज्याचा आगामी अर्थसंकल्प शेतकरी, महिला, युवक यांच्यासह सर्व जनतेच्या भल्याचा असेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज व्यक्त केला. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित वार्ताहर परिषदेत ते बोलत होते.  राज्यातल्या सर्व मुद्द्यावर सरकार विरोधकांशी चर्चा करायला तयार आहे. पण विरोधकांना केवळ जनतेची दिशाभूल करायची आहे, त्यामुळे ते चर्चेला तयार नसल्याचं ते म्हणाले. विरोधकांनी राज्याच्या हिताचे अनेक प्रकल्प थांबवले. आमच्या सरकारने अनेक प्रकल्पांना मंजुरी दिली, ते पूर्णत्वाकडे नेले, असं उपमुख्यमंत्...

June 22, 2024 7:28 PM June 22, 2024 7:28 PM

views 24

पाणीपट्टी दरवाढ महाविकास आघाडीच्या काळात झाली असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्याकडून स्पष्ट

राज्य सरकारनं पाणीपट्टीत दहापट वाढ केल्याची बातमी काँग्रेस पसरवत आहे, मात्र ही संपूर्ण दरवाढ महाविकास आघाडीच्या काळात झाली होती, असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिलं आहे. २९ मार्च २०२२ रोजी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने जारी केलेल्या आदेशानुसार, महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळातच ही दरवाढ झाली. मात्र शेतकऱ्यांना भूर्दंड पडू नये, यासाठी ही दरवाढ स्थगित करण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे, येत्या आठवड्यातच ते पूर्ण होईल, असं फडनवीस यांनी स्पष्ट केलं.