September 6, 2025 10:01 AM

views 31

‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ या विशेष उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये २८ ऑगस्ट ते चार सप्टेंबर दरम्यान घेतलेल्या ७ हजार १५९ आरोग्य शिबिरांतून ३ लाख २६ हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली. यापैकी ९ हजार ९६० रुग्णांना पुढील उपचारासाठी तज्ज्ञांकडे पाठवण्यात आलं. या रुग्णांना पुढील उपचारही मोफत पुरवले जाणार असल्याचं मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक, ...

August 15, 2025 1:47 PM

views 22

उत्तम शिक्षण आणि मनुष्यबळ विकासाच्या जोरावर महाराष्ट्र देशाच्या विकासाचे नेतृत्व करेल, असा मुख्यमंत्र्यांना विश्वास

देशाच्या ७९व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त राज्यात मंत्रालय इथं मुख्य शासकीय सोहळा झाला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना तसंच शहीद जवानांनाही आदरांजली वाहिली. जगातली सर्वोत्तम उत्पादनं भारतात तयार करण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं ते उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले. स्वदेशी उत्पादनांचा वापर करून आत्मनिर्भर भारताला बळकटी दिली जात आहे,  देशात येत असलेल्या परदेशी गुंतवण...

April 5, 2025 3:29 PM

views 18

एमआयडीसी असलेल्या गावांना मिळणार औद्योगिक नगरीचा दर्जा

एमआयडीसी असलेल्या गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा देण्यासंदर्भात धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. यासंदर्भातल्या आढावा बैठकीत काल ते बोलत होते. औद्योगिक क्षेत्राचा विकास अधिक वेगानं करण्यासाठी एमआयडीसी असलेल्या गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा दिल्यास त्या गावांच्या विकासाबरोबरच संबंधित भागात मूलभूत सुविधा आणि पायाभूत प्रकल्पांचा विकास वेगानं होईल. त्याचप्रमाणे पाणीपुरवठा, रस्ते, वीज आणि इतर सुविधा सुधारण्यावर भर दिला जाईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.  

August 1, 2024 8:49 AM

views 25

मराठवाड्यातल्या सिंचन योजनांसाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नसल्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

मराठवाड्यातल्या सिंचनाच्या योजनांसाठी निधीची कमतरता पडू देणार दिली जाणार नसून, जे प्रकल्प हाती घेतले आहेत त्यासाठी मान्यता आणि प्रशासकीय बाबी तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. काल मुंबईत मराठवाड्यातल्या सिंचन प्रकल्पाबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. इतर मागास आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, आमदार संजय शिरसाट यावेळी उपस्थित होते. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर शहरातल्या नवीन पाणीपुरवठा योजनेसंदर्भातली आढावा बैठकही काल फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या...

July 4, 2024 9:27 AM

views 26

पुणे शहराला पाणी कमी पडू दिलं जाणार नाही-जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

पुणे शहराची वाढती लोकसंख्या, गावांची संख्या लक्षात घेऊन राज्य शासन पुणे शहराच्या पाणी पुरवठ्याकरता नवीन स्रोत निर्माण करण्यासाठी काम करत आहे असं सांगून कुठल्याही परिस्थितीत पुणे शहराला पाणी कमी पडू दिलं जाणार नाही अशी ग्वाही जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिली. पुण्यात गळती होणाऱ्या 40 टक्के पाण्याची बचत समान पाणी वाटप योजनेच्या माध्यमातून केल्यावर 4 टीएमसी पाणी उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सदस्य रविंद्र धंगेकर यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना फडणवीस ...

July 1, 2024 5:50 PM

views 28

राज्यात स्पर्धा परीक्षांमध्ये गैरप्रकार रोखण्यासाठी या अधिवेशनात नवा कायदा मांडण्यात येणार

राज्यात स्पर्धा परीक्षांमध्ये गैरप्रकार रोखण्यासाठी या अधिवेशनात नवा कायदा मांडण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बातमीदारांशी बोलताना दिली. सरकारने गेल्या अडीच वर्षात विक्रमी १ लाख ८ हजार नोकऱ्या दिल्या आहेत. या सर्व परीक्षा पारदर्शी पद्धतीने पार पडल्या असून लवकरच वर्ग क पदभरती राज्य लोकसेवा आयोगाकडे देण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. नवे फौजदारी कायदे आजपासून लागू झाले असून त्या अनुषंगाने पोर्टल तयार करण्यात आलं आहे, असं फडणवीस म्हणाले. तसंच, हे कायदे केल्याबद्...

June 22, 2024 1:09 PM

views 13

विज्ञान भारती संघटनेचं सहावं राष्ट्रीय अधिवेशन पुण्यात लोणी काळभोर इथल्या एमआयटी मध्ये होणार

विज्ञान विषयाबाबत जनजागृतीसाठी काम करणाऱ्या विज्ञान भारती या संघटनेचं सहावं राष्ट्रीय अधिवेशन आज आणि उद्या पुण्यात लोणी काळभोर इथल्या एमआयटी मध्ये होणार आहे. विज्ञान भारतीचे अध्यक्ष आणि सीएस-आयआर-चे माजी महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी ही माहिती दिली. केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जीतेंद्र सिंह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ आदी मान्यवर या अधिवेशनाच्या विविध सत्रात सहभागी होणार आहेत.