October 15, 2024 8:33 AM October 15, 2024 8:33 AM

views 9

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित भाडेवाढ मागे घेण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय

दिवाळीत प्रवाशांच्या होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित भाडेवाढ मागे घेण्याचा निर्णय एसटी महामंडळानं घेतला आहे. २५ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर दरम्यान ही भाडेवाढ होणार होती. यासंदर्भातलं पत्रक शुक्रवारी महामंडळानं प्रसिद्ध केलं होतं. हे पत्रक मागे घेत असल्याचं एसटी महामंडळानं काल जाहीर केलं.