February 11, 2025 10:25 AM February 11, 2025 10:25 AM

views 15

दिल्लीत आजपासून ऊर्जा सप्ताहाला प्रारंभ

दिल्लीत आजपासून भारत ऊर्जा सप्ताह 2025 चा प्रारंभ होत आहे. येत्या शुक्रवार पर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमाचं पंतप्रधानांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीद्वारे उद्घाटन होणार आहे. या चार दिवसांमध्ये मंत्रीस्तरीय अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सहभाग, प्रदर्शनाची जागा आणि आयोजित केली जाणारी सत्रे यांची संख्या पाहता हा जागतिक स्तरावरील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ऊर्जा कार्यक्रम असेल. देशातली यशस्वी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही जागतिक स्तरावर स्वीकारार्ह आदर्श योजना म्हणून सादर केली जाईल. या सप्ताह...

February 7, 2025 10:01 AM February 7, 2025 10:01 AM

views 16

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या उद्या होणाऱ्या मतमोजणीसाठी सर्व तयारी पूर्ण

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या उद्या होणाऱ्या मतमोजणीसाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मतमोजणी प्रक्रिया सुरळीत आणि निष्पक्षपणे पार पाडण्यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आली असल्याचं दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकारी आर. अ‍ॅलिस वाझ यांनी काल सांगितलं. निवडणूक आयोग आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या सतत देखरेखीखाली ईव्हीएम स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आल्या असून, मतमोजणीसाठी दिल्लीतील 11 जिल्ह्यांमध्ये 19 मतमोजणी केंद्रं स्थापन करण्यात आली आहेत. मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहाय्यक, सूक्ष्म निरीक्षक, सांख्यिकी कर्मचार...

January 16, 2025 2:08 PM January 16, 2025 2:08 PM

views 18

दिल्लीत संध्याकाळपर्यंत पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता – हवामान विभाग

दिल्ली आणि परिसरात आज सकाळी हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे तापमानात घट झाली असली तरी दृश्यमान्यता सुधारली आहे. दिल्लीत संध्याकाळपर्यंत पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं दिली आहे. पश्चिमेला होत असलेल्या हवामान बदलाचा फटका राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि दिल्लीला बसत असल्याची माहिती हवामान संशोधक डॉ. आरके जेनामनी यांनी दिली.

July 29, 2024 1:28 PM July 29, 2024 1:28 PM

views 24

दिल्लीच्या ओल्ड राजिंदर नगर भागातल्या १३ नागरी सेवा प्रशिक्षण केंद्रांना टाळं

दिल्लीच्या ओल्ड राजिंदर नगर भागातल्या १३ नागरी सेवा प्रशिक्षण केंद्रांच्या तळघरांना दिल्ली महानगर पालिकेनं टाळं ठोकलं आहे. तळघरात सुरू असलेली तीन केंद्र बंद करण्यात आली असून राज्य सरकारनं चौकशीचे आदेश दिले आहेत.  या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आणखी पाच जणांना अटक केली असून एकूण आरोपींची संख्या सात झाली आहे.

July 28, 2024 7:59 PM July 28, 2024 7:59 PM

views 16

दिल्लीत खाजगी शिकवणीच्या तळघरात पाणी साचल्यानं ३ जणांचा, तर वीजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू

दिल्लीमधल्या एका खाजगी शिकवणीच्या तळघरात पाणी साचल्यानं तीन जणांचा, तर वीजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू झाला. हे चौघेही विद्यार्थी असून, तीघे जण नागरी सेवा परीक्षेची तयारी करत होते. या विद्यार्थ्यांच्या मृत्यूबद्दल दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.   येत्या मंगळवारपर्यंत या घटनांचा अहवाल सादर करावा असे आदेश त्यांनी विभागीय आयुक्तांना दिले आहेत. या घटनांमधून संबंधित यंत्रणा आणि प्रशासनाचं अक्षम्य दूर्लक्ष दिसून येत आहे, या घटनांना जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई ...

July 1, 2024 7:02 PM July 1, 2024 7:02 PM

views 14

सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना पाच महिन्यांचा कारावास

सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्लीतल्या न्यायालयाने वीस वर्षांपूर्वी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याप्रकरणी पाच महिन्यांचा कारावास ठोठावला आहे. दिल्लीचे सध्याचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी हा खटला दाखल केला होता. मेधा पाटकर यांनी आपल्याबद्दल प्रसिद्दीपत्रकाद्वारे अपमानजनक मजकूर प्रसिद्ध केल्याचा आरोप करत सक्सेना यांनी २००१ साली गुजरातमधल्या अहमदाबाद न्यायालयात याचिका दाखल केली होती. हा खटला २००२ मध्ये दिल्ली न्यायालयात वर्ग करण्यात आला होता. याप्रकरणी २५ मे रोजी नवी दिल्लीत...