October 8, 2024 3:02 PM

views 26

दार्जिलिंगच्या पद्मजा नायडू यांची वर्ल्ड असोसिएशन ऑफ झूस अँड ॲक्वेरियम्स संवर्धन पुरस्कार २०२४ साठी अंतिम स्पर्धक म्हणून निवड

दार्जिलिंगच्या पद्मजा नायडू यांची हिमालयन झूलॉजिकल पार्कच्या रेड पांडा कार्यक्रमाची वाझा, अर्थात वर्ल्ड असोसिएशन ऑफ झूस अँड ॲक्वेरियम्स संवर्धन पुरस्कार २०२४ साठी अंतिम स्पर्धक म्हणून निवड झाली आहे. पद्मजा नायडू हिमालयन प्राणी उद्यानानं विविध संस्थांच्या सहकार्यानं अनेक पुनर्वसन उपक्रम हाती घेतले होते. वाझा पुरस्काराच्या विजेत्याची घोषणा पुढील महिन्याच्या ७ तारखेला ऑस्ट्रेलियातील तारोंगो प्राणीसंग्रहालयातील ७९ व्या वाझा वार्षिक परिषदेत केली जाईल.  

June 18, 2024 9:11 AM

views 26

दार्जिलिंगमध्ये झालेल्या रेल्वे अपघाताची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली पाहणी

पश्चिम बंगालमध्ये दार्जिलिंग जिल्ह्यात झालेल्या रेल्वे अपघाताची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल सायंकाळी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली, तसंच रुग्णालयात जाऊन जखमींची चौकशी केली. मृतांच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपये तर गंभीर जखमींना अडीच लाख रुपये रेल्वेमंत्र्यांनी मदत जाहीर केली. या अपघाताच्या पार्श्वभूमीवर ईशान्येकडे जाणाऱ्या मार्गावरच्या अनेक रेल्वेगाड्या सध्या रद्द करण्यात आल्या आहेत. काल सकाळी झालेल्या या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला असून, ५० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.राष्ट्रपती द...