June 20, 2024 9:07 AM June 20, 2024 9:07 AM

views 34

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात बेंगळुरू येथे झालेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताचा ४ धावांनी विजय

महिला क्रिकेटमध्ये काल बंगळुरु इथं झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा चार धावांनी पराभव केला. भारतीय महिला संघानं प्रथम फलंदाजी करत ३२६ धावांचं आव्हान दिलं. प्रत्युत्तरादाखल दक्षिण आफ्रिकेचा संघ ३२१ धावात सर्वबाद झाला. या विजयासोबतच भारतानं तीन सामन्यांच्या मालिकेत दोन - शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे.