September 6, 2025 5:34 PM September 6, 2025 5:34 PM

views 65

राज्यातल्या शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध

राज्यातल्या शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी शिक्षणतज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याबाबतचा शासन निर्णय काल प्रसिद्ध झाला. या समितीत भाषा सल्लागार समितीचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे माजी संचालक डॉ. वामन केंद्रे, शिक्षणतज्ञ डॉ. अपर्णा मॉरिस, डेक्कन महाविद्यालयाच्या भाषा विज्ञान प्रमुख सोनाली कुलकर्णी, शिक्षणतज्ञ डॉ. मधुश्री सावजी आणि बालमानसतज्ञ डॉ. भूषण शुक्ल हे सदस्य असतील, तर समग्र शिक्षा अभियानाचे राज्य प्रकल्प संचालक संजय याद...