November 6, 2024 1:51 PM

views 15

तेलंगणातल्या नागरिकांचं सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, नोकरीविषयक आणि जातनिहाय सर्वेक्षण आजपासून सुरू

तेलंगणातल्या नागरिकांचं सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, नोकरीविषयक आणि जातनिहाय सर्वेक्षण आजपासून सुरू झालं. घरोघरी जाऊन ही माहिती गोळा करण्यासाठी १ लाखाहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. राज्य नियोजन आयोगाच्या अखत्यारीत महिनाअखेरपर्यंत हे सर्वेक्षण चालणार आहे. गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं जातिनिहाय जनगणना करण्याचं आश्वासन दिलं होतं.

September 7, 2024 9:24 AM

views 15

तेलंगणा राज्यातील ३३ पैकी २९ जिल्हे पूरग्रस्त घोषित

तेलंगणा राज्यातील ३३ पैकी २९जिल्हे पूरग्रस्त म्हणून घोषित केले आहेत. तत्काळ मदत कार्य करण्यासाठी या जिल्ह्यांना प्रत्येकी तीन कोटी रुपयांची मदत राज्य सरकारनेही जाहीर केली आहे. यापूर्वी चार जिल्हे पूरग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले असून तेथे मदतकार्य सुरू आहे. राज्यात पावसाशी संबंधित घटनांमुळे मृतांची संख्या २९ झाली आहे. राज्य सरकारने आवश्यक त्या नमुन्यात तोटा तयार करण्यासाठी जिल्हानिहाय विशेष अधिकारी नेमला आहे.

June 22, 2024 2:24 PM

views 16

तेलंगणातल्या शेतकऱ्यांचं पीक कर्ज माफ करण्याची मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची घोषणा

तेलंगणातल्या शेतकऱ्यांचं पीक कर्ज माफ करण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केली आहे. मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय झाल्यानंतर वार्ताहरांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. १२ डिसेंबर २०१८ ते १२ डिसेंबर २०२३ या दरम्यान पीक कर्ज घेतलेले शेतकरी या सवलतीसाठी पात्र असतील. कर्जमाफीचे निकष लवकरच जाहीर करण्यात येतील. यासाठी सरकारी तिजोरीतून ३१ हजार कोटी रुपये खर्च होणार असून राज्यातल्या ४० लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असल्याचं रेड्डी यांनी सांगितलं.