June 18, 2025 9:51 AM June 18, 2025 9:51 AM

views 9

तिरंदाजीच्या आशिया करंडक स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात वैयक्तिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंची अंतिम फेरीत धडक

तिरंदाजीच्या आशिया करंडक स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात, काल सिंगापूरमध्ये झालेल्या स्पर्धेत पुरूष आणि महिला वैयक्तिक स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू अंतिम फेरीत पोचले. पुरूषांच्या वैयक्तिक स्पर्धे, कुशाल दलालने बांग्लादेशच्या हिमू बच्चरला मात दिली. तर महिलांच्या संयुक्त विभागात, भारताचे सुवर्ण आणि रौप्य पदक निश्चित झाले आहे. शानमुखी नागा साई बुद्दे आणि तेजल साळवे यांनी अंतिम फेरीत धडक मारली आहे.

October 21, 2024 2:41 PM October 21, 2024 2:41 PM

views 8

तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या दीपिका कुमारीला महिलांच्या रिकर्व्ह प्रकारात रौप्य पदक

मेक्सिको इथे सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताच्या दीपिका कुमारी हिला आज महिलांच्या रिकर्व्ह प्रकारात रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत चीनच्या ली जियामन हिने सुवर्णपदक जिंकलं. तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत उपविजेतेपद पटकावण्याची दीपिकाची ही पाचवी वेळ आहे.

June 20, 2024 1:24 PM June 20, 2024 1:24 PM

views 19

विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेच्या तिसऱ्या सत्रात भारतीय महिलांच्या संयुक्त संघाचा अंतिम फेरीत प्रवेश

विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेच्या तिसऱ्या सत्रात भारतीय महिलांच्या संयुक्त संघानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. ज्योती सुरेखा वेण्णम, परनित कौर आणि अदिती गोपीचंद स्वामी यांच्या संघानं उपांत्यपूर्व सामन्यात टर्की संघाचा २३४ - २२७ अशा गुणफरकानं  पराभव केला. भारतीय संघाचा अंतिम सामना इस्टोनिया बरोबर या शनिवारी होणार आहे.