July 23, 2024 12:58 PM

views 24

निपाह व्हायरसच्या पार्श्वभूमीवर तमिळनाडूत अधिक दक्षता बाळगण्यास सुरुवात

निपाह व्हायरसच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर तमिळनाडू सरकारने सीमाभागातल्या जिल्ह्यात अधिक दक्षता बाळगण्यास सुरुवात केली आहे. निलगिरी जिल्ह्यात आजपासून स्क्रिनिंग आणि निगराणी सुरू करण्यात आली आहे. तसंच केरळमधून येणारे नागरिक आणि पर्यटकांची चाचणी करण्यात येत आहे.  बाहेरून येणाऱ्या नागरिकांची स्क्रिनिंग करण्यासाठी राज्य सरकारने पंधरा टीम तैनात केल्या आहेत.

June 21, 2024 2:39 PM

views 38

तमिळनाडूमध्ये कल्लाकुरिची इथं विषारी दारूचं सेवन केल्यानं ४७ जणांचा मृत्यू

तमिळनाडू च्या कल्लाकुरीची इथल्या विषारी दारु सेवन केल्यानं मृत्यू पावलेल्यांची संख्या आता ४७ झाली आहे. या विषारी दारुमुळे एकूण १६५ जण बाधित झाले होते. यातील ११८ बाधितांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. त्यातील सहा जणांची प्रकृती गंभीर असून इतर बाधितांची तब्येत सुधारत असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम.एस. प्रसथं यांनी दिली. या प्रकरणी अटक केलेल्या चार दोषींना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.   मरण पावलेल्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी दहा लाख तर उपचार घेत असलेल्यांना प्रत...