October 4, 2024 2:36 PM
15
स्वातंत्र्यप्राप्तीच्या शतकमहोत्सवापर्यंत भारत नवकल्पना, तंत्रज्ञान आणि संस्कृतींच्या देवाणघेवाणीचं केंद्र बनलेला असेल असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन
भारतीय स्वातंत्र्याला २०४७ मध्ये शंभर वर्षं पूर्ण होत असताना विकसित झालेला भारत हा नवकल्पना, तंत्रज्ञान आणि संस्कृतींच्या देवाणघेवाणीचं केंद्र बनलेला असेल असं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नवी दिल्ली इथं केलं. कौटिल्य इकोनॉमिक कॉनक्लेव्हच्या तिसऱ्या आवृत्तीत त्या बोलत होत्या. हजारो वर्षांपासून भारताने तत्त्वज्ञान, राजकारण, विज्ञान आणि कला या क्षेत्रांमध्ये जे योगदान दिलं आहे, त्याचा विस्तार जगभरात झाला आणि भारताच्या या सामर्थ्याचा उर्वरित जगाला फायदा झाला असंही त्या म्ह...