August 16, 2025 11:34 AM August 16, 2025 11:34 AM

views 45

पुतीन आणि ट्रम्प यांच्यातील महत्त्वाची शिखर परिषद कोणत्याही कराराविना संपन्न

रशियाचे राष्ट्रपती ब्लादीमीर पुतीन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अलास्कामध्ये महत्त्वाची शिखर परिषद कोणत्याही कराराविना संपली. अलास्कातील लष्करी तळावर जवळपास तीन तास झालेल्या चर्चेला मोठी प्रगती असं संबोधलं गेलं असलं तरीही या बैठकीत, युक्रेन रशिया संघर्षासंदर्भात तोडगा निघण्याची अपेक्षा फोल ठरली. बैठकीनंतर झालेल्या संयुक्त परिषदेला संबोधित करताना पुतीन यांनी चर्चेचा मुख्य मुद्दा युक्रेन संघर्ष असल्याचं सांगितलं. हा संघर्ष संपवण्यात रशियाला रस असल्याचं पुतीन म्हणाले. रशियाने...

February 11, 2025 2:16 PM February 11, 2025 2:16 PM

views 23

हमासने इस्त्रायलचे ओलीस सोडले नाही तर इस्रायल आणि हमासमधील युद्धविराम करार रद्द करावा – डोनाल्ड ट्रम्प

हमासने इस्त्रायलचे ओलीस शनिवारी दुपारपर्यंत सोडले नाहीत तर इस्रायल आणि हमास यांच्यातला युद्धविराम करार रद्द करायला हवा, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. इस्रायलने युद्धविराम कराराचा भंग केल्याचा आरोप करत हमासने ओलीसांना सोडायला उशीर लावल्यानंतर ट्रम्प यांनी हे विधान केलं आहे. इस्रायलने सर्व ओलीसांना सोडायची मागणी करावी नाहीतर पुन्हा एकदा युद्ध सुरू करावं असंही ट्रम्प म्हणाले. याआधीच्या एका मुलाखतीत ट्रम्प यांनी गाझा पट्टी ताब्यात घेण्याबद्दल वक्तव्य केलं होतं. गाझा प...

November 11, 2024 2:03 PM November 11, 2024 2:03 PM

views 12

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात दूरध्वनीवरुन चर्चा

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी नुकतीच दूरध्वनीवरुन चर्चा केली. युक्रेन विरुद्धच्या युद्धात आणखी आक्रमकता नको, असा सल्ला ट्रम्प यांनी पुतीन यांना दिला. या मुद्द्यावर रशियासोबत आणखी चर्चा करण्याची तयारी ट्रम्प यांनी दाखवली. बुधवारी ट्रम्प यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोल्डोमोर झेलेन्स्की यांच्याशी चर्चा केली होती.