December 5, 2024 9:25 AM December 5, 2024 9:25 AM

views 10

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. बलभीम पाटोदेकर यांचं निधन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. बलभीम पाटोदेकर यांचं काल छत्रपती संभाजीनगर इथं निधन झालं, ते ८७ वर्षांचे होते. युनायटेड स्टेट्स माहिती सेवेतून त्यांनी मुंबईत अमेरिकी दूतावासात आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. बीडच्या श्री बंकटस्वामी महाविद्यालयात प्राचार्य म्हणून पाटोदेकर यांनी काम केलं, १९८१ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलसचिवपदी त्यांची निवड झाली होती. पाटोदेकर यांच्या पार्थिव देहावर आज छत्रपती संभाजीनगर इथं अंत्यसंस्कार होणार आहेत.