February 7, 2025 9:57 AM February 7, 2025 9:57 AM

views 7

परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. एस जयशंकर आणि ग्रीसचे परराष्ट्र व्यवहार मंत्री यांच्यात द्विपक्षीय बैठक

परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. एस जयशंकर आणि ग्रीसचे परराष्ट्र व्यवहार मंत्री जॉर्ज गेरापेट्रिटिस यांनी काल नवी दिल्ली येथे द्विपक्षीय बैठक घेतली. यावेळी जयशंकर यांनी भारत-ग्रीस भागीदारीचे महत्त्व अधोरेखित केले. भारताला व्यापार, गुंतवणूक आणि तंत्रज्ञान सहकार्याची अपेक्षा असल्याचं त्यांनी सांगितलं. तर ग्रीसचे परराष्ट्र व्यवहार मंत्री जॉर्ज गेरापेट्रिटिस यांनी ग्रीस पर्यटन, संस्कृती आणि व्यापारासह सर्व बाबतीत भारताबरोबर द्विपक्षीय संबंध वाढवू इच्छित असल्याचं स्पष्ट केलं. ग्रीस भारताला संयुक्त राष्ट्र...

October 5, 2024 8:39 PM October 5, 2024 8:39 PM

views 17

आगामी शांघाय सहकार्य संघटना परिषदेत भारत पाकिस्तानसोबत असलेल्या संबंधांबाबत कोणतीही चर्चा करणार नसल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन

आगामी शांघाय सहकार्य संघटना परिषदेत भारत पाकिस्तानसोबत असलेल्या संबंधांबाबत कोणतीही चर्चा करणार नसल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते. सार्कमध्ये गेल्या काही वर्षात बैठकांचं आयोजन न झाल्याने कोणतीही प्रगती साध्य झाली नाही अशी टीका त्यांनी केली. भारतालाही पाकिस्तानबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करायला आवडेल, मात्र यासाठी सीमेपलीकडच्या दहशतवादाकडे दुर्लक्ष करता येणार नाही असं जयशंकर यांनी सांगितलं.

August 10, 2024 11:33 AM August 10, 2024 11:33 AM

views 10

डॉ एस जयशंकर यांनी मालदीवचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मूसा जमीर यांच्यासमवेत पत्रकार परिषदेला संबोधित केले

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर आणि मालदीवचे परराष्ट्र व्यवहार मंत्री, मूसा जमीर यांनी काल मालेमध्ये समुदाय विकास प्रकल्पांचं उद्घाटन करत सामंजस्य करारांची देवाणघेवाण केली. माले इथे परराष्ट्र मंत्री मूसा जमीर यांच्याशी झालेली चर्चा फलदायी झाल्याचं जयशंकर यांनी एक्स या समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. या चर्चेत विकास भागीदारी, क्षमता निर्माण, द्विपक्षीय आणि प्रादेशिक सुरक्षा, व्यापार आणि डिजिटल सहकार्य या विषयांचा समावेश होता. यावेळी रस्त्यावरील दिवे, मानसिक आरोग्य, मुलांची वाचा सुधार उ...

August 10, 2024 2:30 PM August 10, 2024 2:30 PM

views 12

रशियन सैन्यात भरती झालेल्या 91 भारतीय नागरिकांपैकी आठ जणांचा मृत्यू

रशियन सैन्यात भरती झालेल्या 91 भारतीय नागरिकांपैकी आठ जणांचा मृत्यू झाला असून चौदा जणांना सोडण्यात आलं आहे, तर 69 भारतीय नागरिक रशियन सैन्यातून सुटकेच्या प्रतीक्षेत आहेत अशी माहिती काल परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. एस जयशंकर यांनी लोकसभेत दिली. प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पूरक प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते. या प्रकरणी सीबीआयनं 19 व्यक्ती आणि संस्थांवर फौजदारी गुन्हा दाखल केला असून, 10 मानवी तस्करांविरुद्ध पुरेसे पुरावे मिळाले आहेत. तपासादरम्यान एप्रिलमध्ये दोघा आरोपींना तर मे महिन्यात आणखी...

July 4, 2024 2:59 PM July 4, 2024 2:59 PM

views 7

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस.जयशंकर यांनी घेतली चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांची भेट

  परराष्ट्र व्यवहार मंत्री एस.जयशंकर यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांची आज अस्ताना इथं भेट घेतली. सीमाभागातल्या समस्यांवर तोडगा काढण्याच्या दृष्टीने लष्करी आणि राजनैतिक प्रयत्न करण्याबाबत यावेळी दोघांमध्ये चर्चा झाली. एलएसी अर्थात लाइन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलचं पालन करत सीमा भागात शांतता राखणं आवश्यक आहे, असं जयशंकर या बैठकीनंतर म्हणाले. परस्परांचा आदर, संवेदनशीलता आणि समान हितसंबंध यावर भारत आणि चीनचे संबंध अवलंबून असतील असंही ते म्हणाले.    

June 26, 2024 7:54 PM June 26, 2024 7:54 PM

views 12

म्यानमार हिंसाचारामुळे भारताच्या सीमेवर निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल भारताकडून चिंता व्यक्त

भारताच्या सीमेवर म्यानमारमधे सुरू असलेली हिंसा आणि त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती याबद्दल भारताला मोठी चिंता वाटत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी आज सांगितलं. नवी दिल्लीत  जयशंकर तसंच म्यानमारचे उपप्रधानमंत्री आणि परराष्ट्र मंत्री यु थान श्वे यांनी चर्चा केली. त्यावेळी ते बोलत होते.  अंमली पदार्थाची बेकायदा देवाणघेवाण, शस्त्रास्त्र आणि मानवी तस्करी ही प्रमुख आव्हानं असल्याचं जयशंकर यांनी समाजमाध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. म्यावद्दी इथं अडकून पडलेल्या भारतीय नागरिकांन...