October 29, 2024 7:20 PM October 29, 2024 7:20 PM

views 4

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. वीणा देव यांचं निधन

ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर वीणा देव यांचं आज पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. त्या ७५ वर्षांच्या होत्या. गेले काही दिवस  त्या आजारी होत्या. वीणा देव या दिवंगत इतिहास अभ्यासक आणि लेखक गो. नी. दांडेकर यांच्या कन्या तर अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या मातोश्री होत. त्यांच्या पार्थिवावर आज रात्री ९ च्या सुमारास पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्य संस्कार करण्यात येणार असल्याचं त्यांच्या निकटवर्तियांनी सांगितलं. पुण्यातल्या शाहू मंदिर महाविद्यालयात त्यांनी ३२ वर्षं मराठीचं अध्यापन केलं....