July 13, 2024 9:12 PM

views 20

टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा झिंबाब्वेवर निर्णायक विजय

झिंबाब्वेमधे हरारे इथं आज झालेल्या चौथ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारतानं झिंबाब्वेवर १० गडी राखून विजय मिळवला. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला, आणि झिंबाब्वेचा डाव १५२ धावांवर संपुष्टात आणला. झिंबाब्वेचा कर्णधार सिंकदर रझानं सर्वाधिक ४६ धावा केल्या. भारतातर्फे खलिल अहमदनं २, तर तुषार देशपांडे, वाशिंग्टन सुंदर, अभिषेक शर्मा, आणि शिवम दुबे, यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.  भारतानं विजयी लक्ष्य एकही गडी न गमावता १६ व्या षटकातच पार केलं. यशस्वी जयस्वालनं नाबाद ९३,...

July 13, 2024 1:37 PM

views 12

भारत आणि झिम्बाब्वे टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला चौथा सामना आज हरारे इथं रंगणार

क्रिकेटमध्ये भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात सुरू असलेल्या टी ट्वेंटी मालिकेतला चौथा सामना आज हरारे मध्ये संध्याकाळी साडेचार वाजता होणार आहे. या मालिकेत भारत २-१ ने आघाडीवर आहे. मालिकेतल्या पहिल्याच सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर भारतीय संघाने जोरदार पुनरागमन करत पुढच्या दोन्ही सामन्यात झिम्बाब्वेला पराभूत केलं. आजचा सामना दोन्ही संघांच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे. दरम्यान, मालिकेतला पाचवा आणि शेवटचा सामना उद्या होणार आहे.  

July 4, 2024 2:52 PM

views 34

टी ट्वेंटी क्रिकेट विश्वविजेत्या संघाला प्रधानमंत्र्यांची शाबासकी

टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक जिंकून आज बार्बाडोसहून मायदेशी परतलेल्या भारतीय संघानं दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. प्रधानमंत्र्यांनी क्रिकेट संघाला शाबासकी दिली आणि संपूर्ण देशाला त्यांचा अभिमान वाटत असल्याचं सांगितलं . केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी नवी दिल्ली विमानतळावर विश्वविजेत्या संघाचं स्वागत केलं. मोठा जनसमुदाय विमानतळाबाहेर उपस्थित होता. वादळी हवामानामुळे संघाला बार्बाडोसमध्ये अडकून पडावं लागलं होतं. क्रिकेटपटूंचं दुपारी मुंबईत आगमन...

June 20, 2024 8:30 AM

views 27

टी – ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा अफगाणिस्तानसोबत सामना

टी - ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना अफगाणिस्तानसोबत होणार आहे. बार्बाडोस इथं होणारा हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरु होईल. या स्पर्धेत सध्या वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात सामना सुरु आहे. दरम्यान, काल झालेल्या सुपर एट मधल्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं अमेरिकेचा १८ धावांनी पराभव केला.  

June 18, 2024 3:12 PM

views 48

टी २० विश्वचषक स्पर्धेतले सुपर ८ देश निश्चित

टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत सुपर ८ संघ निश्चित झाले आहेत. सुपर ८ च्या पहिल्या गटात भारत, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश आणि अफगाणिस्तान तर दुसऱ्या गटात अमेरिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश आहे. सुपर ८ फेरीतला पहिला सामना उद्या अमेरिका आणि दक्षिण आफ्रिकेत खेळला जाईल. तर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात २० मे रोजी सामना होणार आहे. दोन्ही गटातल्या प्रत्येकी दोन सर्वोत्तम संघांना उपांत्य फेरीत प्रवेश मिळणार आहे.