November 12, 2024 2:45 PM

views 20

विधानसभा निवडणुकीसाठी रत्नागिरीत आज टपाली मतदान सुरू

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी रत्नागिरीत आज टपाली मतदान सुरू आहे. पोलीस, तसंच मतदान केंद्रावर कर्तव्य बजावणारे अधिकारी आणि कर्मचारी यांनी रत्नागिरी शहरातल्या दामले हायस्कूल मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला. विधानसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर उपस्थित राहू न शकणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांसाठी टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याअंतर्गत काल मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात काल एकंदर ११४ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. मुंबई शहर जिल्ह्यातल्या १...