September 24, 2024 8:21 PM September 24, 2024 8:21 PM

views 18

रांचीमधे झारखंड विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, तसंच निवडणुक आयुक्त ग्यानेश कुमार आणि डॉ एस. एस. संधू यांनी आज रांचीमधे झारखंड विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. निवडणुकीत धनशक्तीचा वापर खपवून घेतला जाणार नाही,असं निवडणुक आयोगानं यावेळी राज्यातल्या तसंच केंद्रीय यंंत्रणांना बजावलं. आयोगानं आज राजकीय पक्ष, सुरक्षा यंत्रणा आणि इतर संबधितांच्या बैठका घेतल्या. निवडणुका प्रलोभनमुक्त व्हाव्यात, याची काळजी घेण्याचे निर्देश संबधित यंत्रणांना दिले असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्तांनी बातमीदारांना सांगितलं.  &nbsp...

August 27, 2024 8:25 PM August 27, 2024 8:25 PM

views 18

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झारखंडची अंतिम मतदार यादी जाहीर

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, या राज्याची अंतिम मतदार यादी आज जाहीर झाली. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार ही यादी तयार केली असून, अंतिम यादीनुसार २ कोटी ५७ लाख ७८ हजार १४९ मतदारांची नोंद झाली आहे. त्यापैकी १ कोटी ३० लाख ६५ हजार ४४९ पुरुष मतदार आहेत. १८ ते १९ वर्ष वयोगटातल्या मतदारांची संख्या १० लाख ७४ हजार ७३२ आहे.

August 27, 2024 8:17 PM August 27, 2024 8:17 PM

views 16

दक्षिण गुजरात, सौराष्ट्र, आणि कच्छमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

दक्षिण गुजरात, सौराष्ट्र, आणि कच्छमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. उत्तर गुजरात आणि दक्षिण राजस्थानत आज काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहारमध्ये  काही ठिकाणी उद्यापर्यंत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान, येत्या ३० तारखेपर्यंत गुजरात, आणि महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीजवळ समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता असल्यानं मच्छिमारांना समुद्राच्या न जाण्यचा सल्ला हवामान वि...

July 8, 2024 7:54 PM July 8, 2024 7:54 PM

views 13

झारखंड मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी केला मंत्रिमंडळाचा विस्तार

झारखंड राज्याच्या विधानसभेचा विश्वासदर्शक ठराव संमत होताच मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आज आपल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाचा विस्तार केला. या मंत्रिमंडळात मावळते मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांच्यासह अन्य ११ आमदारांचा समावेश आहे. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी या नवनियुक्त मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. पूर्वीच्या  मंत्रिमंडळात  समाविष्ट असलेले  झारखंड मुक्ती मोर्चाचे आमदार बसंत सोरेन तसंच काँग्रेसचे आमदार बादल पत्रालेख यांना कॅबिनेट मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं आहे.   

July 3, 2024 8:24 PM July 3, 2024 8:24 PM

views 11

झारखंडमधे सरकार स्थापनेसाठी माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा राज्यपालांकडे दावा

झारखंडमधे सरकार स्थापनेसाठी माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा राज्यपालांकडे दावा झारखंड मुक्ती मोर्चाचे कार्याध्यक्ष हेमंत सोरेन पुन्हा एकदा झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळणार आहेत. झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल या इंडी आघाडीच्या घटक पक्षांच्या बैठकीत सोरेन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. विद्यमान मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांच्या रांची इथल्या निवासस्थानी ही बैठक झाली. चंपाई सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. हेमंत सोरेन यांना आर्थिक घोटाळा...

June 27, 2024 8:07 PM June 27, 2024 8:07 PM

views 33

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ

झारखंडमधल्या रांची विशेष पीएमएलए न्यायालयानं माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ केली आहे. जमीन घोटाळा प्रकरणी मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली सोरेन यांच्यासह अन्य ११ आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यानंतर पुढील सुनावणी ११ जुलै रोजी होणार आहे.

June 23, 2024 11:08 AM June 23, 2024 11:08 AM

views 26

नीट परीक्षा 2024 मधील कथित गैरव्यवहार प्रकरणी झारखंडच्या देवघर जिल्ह्यातून सहा जणांना अटक

नीट परीक्षेच्या वादात राष्ट्रीय चाचणी संस्थेचे महासंचालक सुबोध कुमार सिंग यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आलं आहे. भारतीय व्यापार प्रोत्साहन मंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रदीप सिंग खरोला यांच्याकडे एनटीएच्या महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. दरम्यान नीट परीक्षा 2024 मधील कथित गैरव्यवहार प्रकरणी बिहार पोलिसांनी झारखंडच्या देवघर जिल्ह्यातून सहा जणांना अटक केली आहे. संशयितांना देवीपूर पोलीस स्टेशन परिसरात एम्स-देवघर परिसरात पकडण्यात आलं. बिहार पोलिसांची आर्थिक गुन्हे ...