December 4, 2024 2:17 PM December 4, 2024 2:17 PM

views 4

बीएसएनएलच्या ५० हजारांहून जास्त कर्मचाऱ्यांची सरकारने घेतली जबाबदारी- ज्योतिरादित्य सिंधिया

बीएसएनएल या तोट्यात असलेल्या कंपनीला केंद्र सरकारनं दिलेल्या पुनरुज्जीवनानंतर कंपनीला नफा झाल्याची माहिती केंद्रीय संपर्क मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आज लोकसभेत पुरवणी प्रश्नांच्या उत्तरात दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारनं बीएसएनएलच्या ५० हजारांहून जास्त कर्मचाऱ्यांची जबाबदारी घेतल्याचंही ते यावेळी म्हणाले.