November 6, 2024 2:08 PM November 6, 2024 2:08 PM

views 11

ज्येष्ठ लोकगायिका शारदा सिन्हा यांचं निधन

ज्येष्ठ लोकगायिका शारदा सिन्हा यांचं काल नवी दिल्लीत निधन झालं. त्या 72 वर्षांच्या होत्या. बिहारमधल्या लोकप्रिय गायिका शारदा सिन्हा यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात उद्या पाटणा इथं अंत्यसंस्कार होणार आहेत. नवी दिल्लीतल्या एम्समध्ये काल रात्री त्यांचं निधन झालं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. शारदा सिन्हा यांची मैथिली आणि भोजपुरी लोकगीते गेल्या अनेक दशकांपासून खूप लोकप्रिय आहेत, असं प्रधानमंत्री म्हणाले.श...