January 22, 2025 8:42 AM January 22, 2025 8:42 AM

views 6

वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार डॉ. किसन महाराज साखरे यांचं निधन

संत साहित्याचे अभ्यासक आणि वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार डॉ. किसन महाराज साखरे यांच्यावर काल आळंदी इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचं सोमवारी रात्री पुण्यात एका खासगी रुग्णालयात निधन झालं. कीर्तन प्रवचनातून आध्यात्मिक प्रबोधन करतानाच हजारो लोकांना व्यसनमुक्त करण्याचं सामाजिक कार्य किसन महाराज साखरे यांनी केलं. संस्कृत आणि मराठीतून एकंदर 115 ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. अध्यात्म, वैदिक ज्ञान परंपरेचा निस्सीम...