February 7, 2025 2:27 PM February 7, 2025 2:27 PM

views 8

युरियाची अनावश्यक टंचाई निर्माण करणाऱ्यांवर राज्य सरकारांनी कारवाई करावी – जे. पी. नड्डा

देशात युरिया खतांचा तुटवडा नाही. नफा मिळवण्यासाठी बाजारात युरियाची अनावश्यक टंचाई निर्माण करणाऱ्यांवर राज्य सरकारांनी कारवाई करावी, असं आवाहन आज केंद्रीय रसायन आणि खते मंत्री जे. पी. नड्डा यांनी राज्यसभेत केलं. समाजवादी पार्टीचे खासदार आनंद भदौरिया यांनी उत्तर प्रदेशात युरिया खतांचा तुटवडा असल्याचा दावा केला. मात्र, तो नड्डा यांनी फेटाळून लावला. युरिया खतांचा पुरवठा योग्य रितीने होत असून त्याचे तपशील मंत्रालयाकडे उपलब्ध आहेत, असंही नड्डा यावेळी म्हणाले. शेतकऱ्यांना वेळेवर पुरवठा करता यावा यासाठी...

November 9, 2024 11:35 AM November 9, 2024 11:35 AM

views 9

वैद्यकीय उपकरणनिर्मिती उद्योगासाठी केंद्र सरकारची 500 कोटींची योजना

केंद्रीय रसायन आणि खते मंत्री जे.पी. नड्डा यांनी काल नवी दिल्ली इथं वैद्यकीय उपकरण उद्योगाला बळकटी देण्यासाठीच्या उत्पादन निगडित प्रोत्साहन योजनेचं उद्धघाटन केलं. ही योजना देशाला वैद्यकीय उपकरण उद्योग क्षेत्रात स्वावलंबी बनवेल आणि या क्षेत्रासाठी क्रांतीकारी ठरेल, असा विश्वास नड्डा यांनी यावेळी व्यक्त केला. ही नवी योजना 500 कोटी रुपयांची असून, यात वैद्यकीय उपकरण क्लस्टरसाठी सुविधा, क्षमता निर्माण आणि कौशल्य विकास, आयात अवलंबित्व कमी करण्यासाठी योजना, क्लिनिकल अभ्यास कार्यक्रम आणि वैद्यकीय उपकरणा...

October 18, 2024 6:48 PM October 18, 2024 6:48 PM

views 9

नकारात्मक शक्तींपासून राष्ट्राची सुरक्षा होण्याची गरज – भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा

राष्ट्रसेवा करण्यासाठी संतांचा आशीर्वाद हवा. नकारात्मक शक्तींपासून राष्ट्राची सुरक्षा होण्याची गरज असल्याचं प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज केलं. मुंबईत आज त्यांनी विविध धार्मिक संस्थांच्या विश्वस्तांशी संवाद साधला. विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते.

July 21, 2024 6:46 PM July 21, 2024 6:46 PM

views 9

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेतून विक्रेत्यांना आतापर्यंत ८,६०० कोटी रुपयांचा निधी वाटप

प्रधानमंत्री स्वनिधी योजना सुरू झाल्यापासून केंद्रानं विक्रेत्यांना आतापर्यंत आठ हजार सहाशे कोटी रुपयांचा निधी वाटप केलं असल्याची माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे.पी. नड्डा यांनी काल दिली. नड्डा यांच्या हस्ते काल रस्त्यावरील खाद्य पदार्थ विक्रेत्यांसाठी अन्नसुरक्षेसंदर्भातल्या पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी या विक्रेत्यांसाठी अन्नसुरक्षेसंदर्भात मार्गदर्शक तत्वंही जारी करण्यात आली. दिल्लीत काल, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या वतीनं रस्त्यावरील खाद...

July 13, 2024 10:18 AM July 13, 2024 10:18 AM

views 7

जे पी नड्डा यांनी घेतला आयुष्यमान भारत डिजिटल अभियानाचा आढावा

केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी काल नवी दिल्ली इथं राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीत आयुष्यमान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेचा आयुष्यमान भारत डिजिटल अभियानाचा आढावा घेतला. नड्डा म्हणाले कीं, या दोन्ही योजना आपापली उद्दिष्टे यशस्वीरीत्या पूर्ण करत आहेत. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 34 कोटीहीन अधिक आयुष्यमान कार्डाचं वाटप आणि 7 कोटी 35 लाखाहून अधिक रुग्णांना रुग्णालयात भरती होण्याची सुविधा पुरविण्यात आली असल्याचं त्यांनी नमूद केलं. अशाप्रकारे एक लाख कोट...