September 6, 2025 1:42 PM September 6, 2025 1:42 PM

views 15

भारत रशियाकडून तेल खरेदी करत राहील अशी केंद्रीय अर्थमंत्र्यांची स्पष्टोक्ती

भारत यापुढेही रशियाकडून तेल खरेदी करत राहील आणि कोणत्याही निर्णयामागे राष्ट्रहित सर्वोपरी असेल असं ठाम प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. रशियाकडून तेलाची खरेदी असो किंवा अन्य मुद्दा असो, योग्य दर आणि लॉजिस्टिक्सनुसार आपल्या आवश्यकतांना प्राधान्य दिलं जाईल, असं त्या काल एका मुलाखतीत  म्हणाल्या. भारताच्या आयातीत कच्च्या तेलाचं प्रमाण अधिक असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.  नवीन जीएसटी प्रणालीमुळे वस्तूंचा खप वाढेल मात्र त्यामुळे भांडवली खर्चावर काहीही परिणाम होणार नाही...

August 16, 2025 11:43 AM August 16, 2025 11:43 AM

views 10

जीएसटी दरांमधील सुधारणांच्या संकेताचे व्यापार जगताकडून स्वागत

स्वातंत्र्यदिनाच्या संबोधनामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जीएसटीमध्ये सुधारणा करून, उद्योगजगत आणि सामान्य नागरिकांवरचा बोजा कमी करण्याचे संकेत दिले. जीएसटी सुधारणा ही काळाची गरज असल्याचे सांगून जीएसटी दरांचा आढावा घेण्याची गरज मोदींनी अधोरेखित केली होती.  प्रधानमंत्र्यांच्या या घोषणेचे उद्योग जगताकडून स्वागत झाले आहे. कर प्रणालीचे सुलभीकरण आणि व्यापाराला चालना देण्यासाठी हे अत्यंत आवश्यक पाऊल असल्याची प्रतिक्रिया उद्योग जगताकडून आली आहे. सध्या व्यापाऱ्यांना ५ ते २८ टक्के करदराला तोंड द्या...

August 15, 2025 8:30 PM August 15, 2025 8:30 PM

views 25

जीएसटी मधे येत्या दिवाळीत सुधारणा करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा

भारताला २०४७ पर्यंत विकसित करण्यासाठी आणि समृद्ध भारत निर्माण करण्यासाठी सर्वस्व अर्पण करुन काम करा, नवीन संधी निर्माण करा, आणि देशातल्या १४० कोटी नागरिकांना त्याचा लाभ मिळेल यासाठी प्रयत्न करा, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. त्यानंतर त्यांनी देशवासियांना संबोधित केलं. देशवासियांना संबोधित करताना सुरुवातीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातल्या महापुरुषांना अभिवादन केलं तसं...

June 23, 2024 10:12 AM June 23, 2024 10:12 AM

views 13

पोलाद, लोह आणि ॲल्युमिनियमपासून निर्मित दुधाच्या कॅनवर 12 टक्के एकसमान जीएसटी दराची शिफारस

वस्तु आणि सेवा कर परिषदेनं पोलाद, लोह आणि ॲल्युमिनियमपासून निर्मित दुधाच्या कॅनवर 12 टक्के वस्तु आणि सेवा कर म्हणजे जीएसटीच्या एकसमान दराची शिफारस केली आहे. नवी दिल्ली इथं काल झालेल्या ५३व्या वस्तु आणि सेवा कर परिषदेच्या बैठकीनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी माध्यमांशी बोलताना, रेल्वे फलाट तिकिटं, विश्राम कक्ष आणि प्रतीक्षा कक्षाच्या सुविधांसाह भारतीय रेल्वेकडून सर्वसामान्य नागरिकांना पुरवल्या जाणाऱ्या सेवा तसच बॅटरीवर चालणाऱ्या कार सेवांवर कोणताही जीएसटी लागणार नाही अशी घोषणा केली. विविध ...

June 22, 2024 8:09 PM June 22, 2024 8:09 PM

views 28

बनावट बिलांच्या आधारे इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा करण्याचे प्रकार रोखण्यासाठी आधारसंलग्न बायोमेट्रीक आधारित यंत्रणा जीएसटीमध्ये राबवली जाणार

बनावट बिलांच्या आधारे इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा करणारे प्रकार रोखण्यासाठी आधारसंलग्न बायोमेट्रीक आधारित यंत्रणा जीएसटीमध्ये राबवली जाणार आहे. वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या ५३ व्या  बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. गुजरात, पुद्दुचेरीमध्ये याची चाचणी झाली असून टप्प्याटप्प्याने देशभरात अंमलबजावणी होईल, असं त्या म्हणाल्या. रेल्वेचं प्लॅटफॉर्म तिकीट, प्रतीक्षा कक्ष यासारख्या सुविधांना जीएसटीतून वगळल्याचंही त्या म्हणाल्या.