April 17, 2025 2:58 PM April 17, 2025 2:58 PM
6
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी लादलेल्या वाढीव आयात शुल्कामुळे जगभरातील व्यापारात घट होण्याचा जागतिक व्यापार संघटनेचा अंदाज
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी लादलेल्या वाढीव आयातशुल्कामुळे जगभरातील व्यापारात घट होईल, असा अंदाज जागतिक व्यापार संघटनेनं म्हणजे डब्ल्यूटीओनं व्यक्त केला आहे. या संघटनेनं २०२५ आणि २०२६ या वर्षांसाठीच्या व्यापाराचा अंदाज काल प्रसिद्ध केला. त्यात अमेरिका आणि चीनमधल्या व्यापार संघर्षाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. डब्ल्यूटीओच्या महासंचालक नगोझी ओकोंजो-इविला यांनी याबाबत निवेदन प्रसिद्ध केलं आहे. अमेरिका आणि चीन यांच्यातला व्यापार ८१ टक्क्यांनी कमी होईल असं त्यांनी म्हटलं आहे. जगभरातील ...