June 20, 2025 3:37 PM June 20, 2025 3:37 PM

views 5

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. धरणगाव इथल्या ग्रामीण रुग्णालयाचं उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करून ५० खाटांचं अत्याधुनिक उपजिल्हा रुग्णालय उभारण्याच्या कामाचा प्रारंभ फडणवीस यांच्या हस्ते आज झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील होते. याप्रसंगी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, इतर लोकप्रतिनिधी आणि विविध विभागांचे अधिकारी तसंच मान्यवर उपस्थित होते. या प्रकल्पासाठी शासनाने ३९ कोटी ४६ लाख...

April 17, 2025 10:59 AM April 17, 2025 10:59 AM

views 11

उत्तम आरोग्यासाठी रोज केळी खाण्याचा आरोग्यतज्ञांचा सल्ला

अखिल भारतीय केळी उत्पादक महासंघाच्या वतीनं जळगाव जिल्ह्यातल्या रावेर इथं काल जागतिक केळी दिन साजरा करण्यात आला. केळ्यांमधल्या पोषणमूल्यांबाबत जागरूकता वाढून त्याचं सेवन वाढावं यासाठी केळी दिवस साजरा केला जातो... जागतिक केळी उत्पादनाच्या ३० टक्के केळ्यांचं उत्पादन भारतात होतं. मात्र भारतीयांमध्ये आवश्यक त्या प्रमाणात केळी खाल्ली जात नाही. सर्वांगीण दृष्टीनं विचार केल्यास केळी हे सहज उपलब्ध होणारं, पौष्टीक फळ असून, त्याचा आहारात रोज समावेश केल्यास आरोग्य उत्तम राहिल असा सल्ला ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ ड...

April 9, 2025 10:30 AM April 9, 2025 10:30 AM

views 5

जळगाव मधल्या नव्या वसतीगृहांसाठी प्रस्ताव पाठविण्याचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे निर्देश

जळगाव मधल्या नव्या वसतीगृहांसाठी प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल दिले. ते काल जळगाव मध्ये झालेल्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत बोलत होते. या बैठकीत आठवले यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, भारत सरकार शिष्यवृत्ती योजना, प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना, आवास योजना आणि इतर सामाजिक न्याय योजनांचा आढावा घेतला.