June 18, 2025 2:20 PM June 18, 2025 2:20 PM

views 13

जर्मनी इथे होणाऱ्या हॉकी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारताचा कनिष्ठ पुरुष हॉकी संघ बेंगळुरूहून रवाना

जर्मनी इथे होणाऱ्या ४ राष्ट्रांच्या हॉकी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आज भारताचा कनिष्ठ पुरुष हॉकी संघ बेंगळुरूहून रवाना झाला. कर्णधार अराईजित सिंह हुंडल याच्या नेतृत्वाखाली हा संघ येत्या २१ जून रोजी यजमान जर्मनी संघाबरोबर लढत देईल. त्यानंतर २२ जून रोजी ऑस्ट्रेलिया आणि २४ जून रोजी स्पेनशी या संघाचा सामना होणार आहे.  

June 20, 2024 12:20 PM June 20, 2024 12:20 PM

views 16

जर्मनीने हंगेरीवर २-० असा विजय मिळवून UEFA युरो अंतिम १६ मध्ये मिळवले पहिले स्थान

UEFA युरोपियन फुटबॉल चॅम्पियनशिपमध्ये, काल रात्री हंगेरीवर २-० असा विजय मिळवून अंतिम १६ मध्ये स्थान मिळवणारा जर्मनी पहिला संघ ठरला.जमाल मुसियाला आणि इल्क गुंदोगन यांच्या गोलने यजमान संघाची बाद फेरीपर्यंतची प्रगती सुनिश्चित केली. आणखी एका रोमांचक सामन्यात, स्कॉटलंडने स्वित्झर्लंडशी बरोबरी साधून शेवटच्या १६ मध्ये प्रवेश करण्याच्या आशा जिवंत ठेवल्या. दरम्यान,क्रोएशिया आणि अल्बानिया यांच्यात २-२अशी बरोबरी राहिल्याने स्पर्धेच्या गट टप्प्यातील उत्कंठा आणखी वाढली आहे.