April 9, 2025 3:16 PM April 9, 2025 3:16 PM

views 4

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची तीनशे वी जयंती ३१ मे रोजी होणार साजरी

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची तीनशे वी जयंती ३१ मे रोजी साजरी केली जाणार आहे. त्यानिमित्त मुंबईतल्या चर्चगेट रेल्वे स्थानक परिसरातल्या अहिल्याबाईंच्या पुतळ्याचं सुशोभीकरण करण्याचा निर्णय, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. पुतळ्याच्या परिसरात अहिल्यादेवींनी केलेली समाजोपयोगी कामं, महेश्वर इथला राजवाडा, इंदूरमधली वास्तूशिल्प, काशी विश्वनाथ मंदिराचा जीर्णोध्दार यांचा आकर्षक प्रकाश योजनेसह देखावा तयार करण्यात येणार आहे. सुशोभीकरणाचं काम १५ मे पूर्...