October 12, 2024 8:18 PM

views 41

जम्मू काश्मीरमध्ये १६ ऑक्टोबर आणि हरियाणामधे १७ ऑक्टोबरला नवीन सरकारचा शपथविधी

हरियाणामधे नवीन सरकारचा शपथविधी येत्या गुरुवारी १७ ऑक्टोबरला होणार आहे अशी माहिती काळजीवाहू मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांनी दिली. लडवा इथं आज ते पत्रकारपरिषदेत बोलत होते. मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांच्यासह काही मंत्री पंचकुलामध्ये पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील. या शपथविधी सोहळ्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भाजपाचे इतर ज्येष्ठ नेते उपस्थित  राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं.    जम्मू-काश्मिरमध्ये नॅशनल  कॉन्फरन्सच्या नेतृत्त्वाखालच्या आघाडीनं काल सत्ता स्थापनेचा दावा नायब राज्यपाल मनोज स...