June 18, 2024 11:20 AM June 18, 2024 11:20 AM
19
नीतीन गडकरी यांच्याद्वारे जम्मू आणि काश्मीरमधील रस्ते आणि महामार्ग प्रकल्पाच्या कामांचा आढावा
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नीतीन गडकरी यांनी काल जम्मू आणि काश्मीरमधील रस्ते आणि महामार्ग प्रकल्पाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी श्रीनगर इथं राजभवनमध्ये स्वतंत्र बैठक घेतली. यावेळी या भागात अत्यंत खर्चीक अशी पायाभूत सुविधा उभारणीची आणि रस्ते प्रकल्पांची कामं सुरू केल्याबद्दल जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गडकरी यांचे आभार मानले. आम्ही जम्मू आणि काश्मीरच्या मजबूत आणि उज्ज्वल भवितव्यासाठी अत्यंत समर्पित भावनेनं काम करीत आहोत. या नव्या प्...