February 3, 2025 10:39 AM February 3, 2025 10:39 AM

views 19

जपानने त्यांच्या नव्या एची थ्री रॉकेटद्वारे नव्या दिशादर्शक उपग्रहाचं केलं यशस्वी प्रक्षेपण

जपानने काल त्यांच्या नव्या एची थ्री रॉकेटद्वारे नव्या दिशादर्शक उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केलं. देशाला अचूक स्थाननिश्चिती प्रणाली हवी असल्यानं या उपग्रहाचं प्रक्षेपण कऱण्यात आलं. दोन आठवड्यात त्याच्या लक्ष्यित कक्षेत पोहोचण्याची अपेक्षा आहे.

September 27, 2024 1:29 PM September 27, 2024 1:29 PM

views 23

जपानचे नवे प्रधानमंत्री शिगेरू इशिबा

जपानचे नवे प्रधानमंत्री म्हणून शिगेरू इशिबा हे निवडून आले आहेत. इशिबा यांनी २१५ मतं मिळवून प्रतिस्पर्धी उमेदवार साने ताकाईची यांचा पराभव केला आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यात जपानच्या संसदेची बैठक झाल्यानंतर इशिबा हे जपानचे प्रधानमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारतील.

July 9, 2024 11:15 AM July 9, 2024 11:15 AM

views 14

जपानमध्ये पश्चिम ओगासावारा बेटांवर 6 पूर्णांक3 दशांश अंश तीव्रतेचा भूकंप

जपानमध्ये आज सकाळी पश्चिम ओगासावारा बेटांवर 6 पूर्णांक3 दशांश अंश तीव्रतेचा भूकंप झाला. भारतीय प्रमाण वेळेनुसार हाभूकंप काल मध्यरात्री 1 वाजून 32 मिनिटांनी झाला. भूकंपाचं केंद्र पश्चिमओगासावारा बेटांवर 530 किलोमीटर खोलीवर, 27 पूर्णांक1 दशांश अंश उत्तर अक्षांश आणि 139 अंशपूर्व रेखांशावर होतं. या भूकंपामुळेत्सुनामीचा धोका नसून कोणीही जखमी झाल्याचं किंवा कोणतंही नुकसान झाल्याचं वृत्तनाही असं जपानच्या स्थानिक हवामान संस्थेनं म्हटलं आहे.

July 6, 2024 7:46 PM July 6, 2024 7:46 PM

views 15

वाहन उद्योग क्षेत्रात गेल्या दहा वर्षांत भारतानं जपानला मागे टाकले आहे-मंत्री नितीन गडकरी

वाहन उद्योग क्षेत्रात गेल्या दहा वर्षांत भारतानं जपानला मागे टाकले आहे. देशाच्या वाहन उद्योगाची उलाढाल ७ लाख कोटींवरून २० लाख कोटींवर पोहचली आहे. येत्या काळात ही उलाढाल ५० लाख कोटींवर पोहचविण्याचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले. नागपुरात एका कंपनीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. राज्यात सेमिकंडक्टरचा प्रकल्प यावा यासाठी काही कंपन्यांसोबत चर्चा सुरू असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमात सांगितलं.