February 6, 2025 9:06 AM

views 13

प्रयागराज येथील महाकुंभमध्ये आज जनजाती सांस्कृतिक संमेलनाचं आयोजन

प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभमध्ये आज जनजाती सांस्कृतिक संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. यामध्ये देशभरातील पंधरा हजारांहून आधिक आदिवासी बांधव सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात आदिवासी समाजासाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विविध राज्यातील 25 तरुणांना पुरस्कार देण्यात येणार आहे. तसंच आदिवासी संस्कृतीशी संबंधित एक प्रदर्शनही आयोजित करण्यात आलं असून देशभरातील 120 सांस्कृतिक नृत्य पथकं आपली कला सादर करणार आहेत. दरम्यान, प्रयागराज इथं सुरु असलेल्या कुंभमेळ्यात काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संगमस्था...