February 5, 2025 10:40 AM February 5, 2025 10:40 AM

views 19

कर्करोगापासून बचाव करण्यासाठी राज्यात जनजागृती आवश्यक असल्याचं, आरोग्य मंत्र्यांचं प्रतिपादन

कर्करोगापासून बचाव करण्यासाठी राज्यात जनजागृती आवश्यक असल्याचं, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने कर्करोग तपासणी आणि जनजागृती मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ आबिटकर यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. नांदेड जिल्हा रुग्णालयातही जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. आय. भोसीकर यांच्या हस्ते जागतिक कर्करोग दिनाच्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. यावेळी तज्ज्ञांकडून कर्करोग आजारासंबंधी मार्गदर्शन करण्यात आलं.  

November 11, 2024 11:21 AM November 11, 2024 11:21 AM

views 5

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आजपासून चित्ररथाद्वारे मतदार जनजागृती मोहिम

छत्रपती संभाजीनगर इथं आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी शासकीय सेवेतल्या एका अधिकाऱ्यावर प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्याचे आदेश देण्यात आले असून, दुसऱ्या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यास ताकीद दिली आहे. यासंदर्भात खुलताबादच्या कोहीनूर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर अंभोरे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक येरेकर यांच्याविरोधात तक्रार प्राप्त झाल्यानंतर, आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी सुनावणी घेतली...

August 10, 2024 1:49 PM August 10, 2024 1:49 PM

views 19

सिंहांच्या संवर्धनासाठी आज जागतिक सिंह दिन साजरा

जंगलचा राजा सिंहाच्या संवर्धनाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने आज जागतिक सिंह दिवस साजरा केला जात आहे. सिंहांची घटती संख्या आणि त्यांचं विविध धोक्यांपासून संरक्षण करण्याची तातडीची गरज-याकडे जगाचं लक्ष वेधणे; हा या दिवसाचा उद्देश आहे. भारतात सिंहांच्या संवर्धनाला सांस्कृतिक आणि पर्यावरणीय महत्त्व आहे. केवळ गीरच्या जंगलात आढळणार्‍या आशियाई सिंहाचं भारत माहेरघर आहे. या प्रदेशातील संवर्धनाच्या प्रयत्नांमुळे 2015 मधल्या सिंहांची संख्या 523 वरून 2020 वर्षामध्ये 674 पर्यंत वाढली असल्याचं पर्यावरण मंत...