July 13, 2024 9:18 AM July 13, 2024 9:18 AM

views 4

केंद्र सरकार राबवत असलेल्या विविध विधायक उपक्रमांमुळे देशात चांगला, शाश्वत बदल घडून आला – उपराष्ट्रपती

केंद्र सरकार राबवत असलेल्या विविध विधायक उपक्रमांमुळे देशात चांगला, शाश्वत बदल घडून आला असून तो विशेषकरुन युवा पिढीच्या फायद्याचा आहे असं प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं आहे. ते काल मुंबईतल्या शैक्षणिक संस्थेत 'भारताचं सबलीकरण-2047 पर्यंत विकसित भारत घडवण्यात उच्च शिक्षण संस्थांची भूमिका' या विषयावरील परिसंवादात बोलत होते. तंत्रज्ञान, डिजिटल रुपांतरण, शाश्वत विकास, उद्योजकता आणि नवोन्मेष यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये विकसित भारत घडवण्यात उच्च शिक्षण संस्था महत्त्वपूर्ण योगदान देऊ श...

July 11, 2024 2:53 PM July 11, 2024 2:53 PM

views 8

उपराष्‍ट्रपती जगदीप धनखड राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार

उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. राज्य विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांना ते आज संबोधित करतील. आपल्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी उपराष्ट्रपती मुंबईतल्या नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या संस्थेच्या विद्यार्थ्यांना संबोधित करणार आहेत.    

July 9, 2024 7:04 PM July 9, 2024 7:04 PM

views 5

उपराष्ट्रपती जगदीप धनखड येत्या ११ तारखेला राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार

उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे उपाध्यक्ष जगदीप धनखड येत्या ११ तारखेला राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार आहेत. विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर आणि विधानपरिषदेच्या उपाध्यक्ष डॉक्टर नीलम गोऱ्हे यांचं यासंदर्भातलं निमंत्रण उपराष्ट्रपतींनी स्वीकारलं आहे. देशाची  लोकशाही मूल्यं आणि नीतिमत्ता वाढवण्याबाबत ते सदस्यांना मार्गदर्शन करतील.

June 20, 2024 1:38 PM June 20, 2024 1:38 PM

views 10

राष्ट्रपतींच्या वाढदिवसानिमित्त उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या वाढदिवसानिमित्त उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानी भेट देत त्यांना निरोगी आणि आनंदी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती मुर्मू यांना समाजमाध्यमावरल्या संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपतींची देशाप्रती सेवा आणि त्याग आपल्यासाठी प्रेरणादायी असल्याचं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले.   राष्ट्रपतींच्या वाढदिवसानिमित्त त्यांची विशेष मुलाख...

June 17, 2024 11:15 AM June 17, 2024 11:15 AM

views 39

संसदेच्या आवारातील प्रेरणा स्थळाचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते उद्घाटन

संसदेच्या आवारात नव्यानं उभारण्यात आलेल्या प्रेरणा स्थळाचं उद्घाटन काल राज्यसभेचे अध्यक्ष, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते झालं. संसदेला भेट देण्यासाठी आलेल्या अभ्यागतांना स्वातंत्र्य लढ्यातील योद्धे आणि नेते यांचे पुतळे एकाच ठिकाणी पाहता यावेत अशा पद्धतीने या प्रेरणा स्थळाची रचना करण्यात आली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं या नेत्यांचं जीवन आणि स्वातंत्र्यलढ्यातलं त्यांचं योगदान याविषयीची सविस्तर माहिती पर्यटकांना देण्याची व्यवस्था इथे करण्यात आली आहे.