October 5, 2024 3:01 PM October 5, 2024 3:01 PM
7
छत्तीसगढमधे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या ३१ वर
छत्तीसगढ मध्ये नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षा दलांनी आणखी तीन नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. त्यामुळे या चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या ३१ झाली आहे. नारायणपूर जिल्ह्यातल्या दक्षिण अबुझमाड भागात काल दुपारी माओवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर राज्य सुरक्षा दल आणि विशेष सुरक्षा दल यांच्या संयुक्त पथकानं गोवेल, नेंदूर आणि थुलथुली भागात शोधमोहिमेला सुरुवात केली. त्यानंतर झालेल्या चकमकीत सुरक्षा जवानांनी नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं. घटनास्थळावरून एके-47, रायफलसह अनेक शस्त्र जप्त ...