June 20, 2025 2:08 PM

views 32

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत एक महिला नक्षलवादी ठार

छत्तीसगडमध्ये आज सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत एक महिला नक्षलवादी ठार झाली. कांकेर जिल्ह्यातल्या अमाटोला आणि कालपर भागातल्या जंगलात ही चकमक झाली. जिल्हा राखीव दल, सीमा सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये अजूनही अधूनमधून गोळीबार सुरू आहे. सुरक्षा दलांची पथकं परिसराची कसून तपासणी करत आहेत.

February 4, 2025 2:21 PM

views 36

छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात नक्षल्यांनी दोन गावकऱ्यांची केली गळा कापून हत्या

छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात काल रात्री नक्षल्यांनी दोन गावकऱ्यांची गळा कापून हत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं. याआधी २६ जानेवारीलाही याच जिल्ह्यात पोलिसांना खबर दिल्याच्या संशयावरून नक्षल्यांनी एका गावकऱ्याला ठार केलं होत. गेल्या वर्षभरात नक्षलवाद्यांनी बस्तर भागातल्या ६८ गावकऱ्यांची हत्या केली आहे .  

January 7, 2025 11:10 AM

views 21

छत्तीसगडमध्ये माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा राष्ट्रपतींनी केला तीव्र निषेध

छत्तीसगडमध्ये बिजापूर जिल्ह्यात माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा राष्ट्रपती द्रौपदी मुरमू यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. माओवाद्यांनी केलेल्या या आयइडी स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला; यामध्ये 8 सुरक्षा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दोन दिवसांपूर्वी छत्तीसगडमध्ये तीन जिल्ह्यांत शोधमोहीम राबवून सुरक्षा यंत्रणांनी पाच माओवाद्यांना ठार केलं होतं. ही कारवाई संपवून सुरक्षा कर्मचारी आपल्या तळावर परतत असताना माओवाद्यांनी स्फोट घडवून त्यांचं वाहन उडवलं. यात वाहनातल्या आठ जवानांसह वाहनचालकाचा मृत्यू झाला.

November 9, 2024 1:55 PM

views 20

रस्ते बांधताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यायला हवं- नितीन गडकरी

देशात होणारे रस्ते अपघात आणि त्यामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी रस्ते बांधताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिलं पाहिजे, असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. छत्तीसगडमध्ये रायपूर इथं इंडियन रोड काँग्रेसच्या ८३ व्या वार्षिक अधिवेशनाचं काल संध्याकाळी उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. रस्ते अभियांत्रिकी आणि ऑटोमोबाईल अभियांत्रिकीमधील त्रुटी सुधारण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचं ते म्हणाले. रस्ते प्रकल्पांच्या संपूर्ण अहवालाची काळजीपूर्वक तपासणी केल्य...

July 29, 2024 9:48 AM

views 23

कनिष्ठ गटाच्या हॉकी इंडिया विभागीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला आणि पुरुष या दोन्ही संघांना उपविजेतेपद

छत्तीसगडमध्ये झालेल्या कनिष्ठ गटाच्या हॉकी इंडिया विभागीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला आणि पुरुष या दोन्ही संघांना उपविजेतेपद मिळालं आहे. पुरुष गटात हॉकी मध्य प्रदेशकडून महाराष्ट्र हॉकी संघाचा 4-6 असा पराभव झाला; तर महिला गटात मध्यप्रदेश संघानेच पेनल्टी शूट आउटमध्ये महाराष्ट्रावर 4-2 अशी मात केली.

June 15, 2024 2:30 PM

views 26

छत्तीसगडमधे सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीत आज ८ माओवादी ठार

छत्तीसगडच्या बस्तर परिसरात सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीत आज ८ माओवादी मारले गेले. अबुझमाडच्या जंगलात माओवादी सक्रीय असल्याची खबर मिळाल्यावरुन ITBP, जिल्हा राखीव पोलीस आणि विशेष कृती दलाच्या संयुक्त पथकानं शोधमोहिम सुरु केली होती. त्यादरम्यान ही चकमक झाली. शोधमोहिम अद्याप सुरु आहे. सुरक्षा दलाचे दोन जवानही चकमकीदरम्यान जखमी झाले.