April 5, 2025 8:33 AM April 5, 2025 8:33 AM

views 11

महसूल विभाग अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं आवश्यक – चंद्रशेखर बावनकुळे

महसूल विभाग हा शासनाचा चेहरा असून पारदर्शक आणि गतिमान कामकाजाबरोबरच नव-तंत्रज्ञानाचा वापर करून, महसूल विभाग अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं आवश्यक असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. पुण्यात आयोजित महसूल क्षेत्रिय अधिकाऱ्यांच्या दोन दिवसांच्या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यावर भर द्यावा, कृत्रिम बुध्दीमत्तेसारख्या नवतंत्रज्ञानाचा वापर करावा, अशी अपेक्षा बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केली.

February 4, 2025 10:11 AM February 4, 2025 10:11 AM

views 28

राज्यात एक लाख ९४ हजार विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्त केले जाणार

राज्यभरात प्रत्येक पाचशे मतदारांमागे कार्यकारी अधिकारी याप्रमाणे एक लाख ९४ हजार विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्त केले जाणार असल्याची माहिती, राज्य निवड समितीचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्ती संदर्भातला सुधारित शासन निर्णय काल जारी करण्यात आला. प्रत्येक ठिकाणी ३३ टक्के महिलांची नियुक्ती केली जाणार असून, या पदावरील व्यक्तीचा कालावधी पाच वर्षांचा असेल, तसंच ग्रामसभेत या अधिकाऱ्यांना विशेष निमंत्रित केलं जाईल, असं या शासन निर्णयात नमूद करण्यात...

June 22, 2024 2:47 PM June 22, 2024 2:47 PM

views 14

महाराष्ट्रात पुन्हा डबल इंजिनचे सरकार येणार – चंद्रशेखर बावनकुळे

महाराष्ट्रात पुन्हा डबल इंजिनचे सरकार येणार असल्याचं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. भाजप प्रदेश कोअर कमिटीची बैठक काल रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी झाली. लोकसभा निवडणुकीत जिथेकमकुवत होतो, तिथे अधिक मेहनत करू असं बावनकुळे यांनी बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं. बैठकीत आगामी विधानसभा निवडणुका, विधानपरिषद निवडणुका आणि महाराष्ट्रातले आरक्षण आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

June 14, 2024 7:17 PM June 14, 2024 7:17 PM

views 34

काँग्रेस आणि महाविकास आघाडीने जनतेला खोटं बोलून मतं घेतल्याचा चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि महाविकास आघाडीने जनतेला संभ्रमित केलं, तसंच खोटं बोलून मतं घेतली, असा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. भाजपाचे नेते आणि कार्यकर्त्यांची बैठक आज मुंबईत झाली. त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. भाजपा संविधान बदलणार असल्याची काँग्रेसने जनतेच्या मनात निर्माण केलेली भिती आपण दूर करु आणि जनतेचा विश्वास संपादित करून विधानसभेची निवडणूक जिंकू, असं ते यावेळी म्हणाले.