September 24, 2024 8:32 PM September 24, 2024 8:32 PM

views 18

बुद्धिबळ ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या ग्रँडमस्टर अभिजित कुंटे यांचं स्वागत

भारतीय महिला संघाने बुडापेस्ट इथं नुकत्याच झालेल्या बुद्धिबळ ऑलिंपिक स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकलं. या संघाचे मार्गदर्शक असणारे पुण्याचे ग्रँडमस्टर अभिजित कुंटे यांचं आज विमानतळावर जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी अनेक आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू उपस्थित होते. भारतीय पुरुष आणि महिला संघांनी ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून जागतिक बुद्धिबळ क्षेत्रात भारताचं वर्चस्व सिद्ध केलं आहे, अशी भावना अभिजित कुंटे यांनी यावेळी व्यक्त केली.