October 3, 2024 8:20 PM October 3, 2024 8:20 PM

views 13

गुजरातमधल्या ४७० कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांची पायाभरणी आणि उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते

महात्मा गांधी यांच्यानंतर स्वच्छता मोहीमेला लोकचळवळीचं रुप मिळवून देणारे आणि स्वच्छता संस्कृती लोकांमध्ये रुजवण्यात महत्वाचं योगदान देणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे प्रमुख नेते आहेत, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. गुजरातमधल्या अहमदाबाद इथं आज अमित शहा यांच्या हस्ते ४७० कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांची पायाभरणी आणि उद्घाटन झालं, त्यानंतर ते जनसभेला संबोधित करत होते.  अमित शहा यांनी अहमदाबादमध्ये आज भाजपाच्या कार्यकर्ता संमेलनात सहभागी होऊन त्यांना मार्गदर्शन केलं.