April 17, 2025 2:05 PM

views 18

बसने एका रिक्षाला दिलेल्या धडकेमुळे झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू

गुजरातच्या पाटण जिल्ह्यात समी - राधनपूर महामार्गावर गुजरात राज्य परीवहन महामंडळाच्या बसने एका रिक्षाला दिलेल्या धडकेमुळे झालेल्या अपघातात रिक्षात बसलेल्या पाच जणांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक पोलीस घटनास्थळावर पोचून त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.  

April 9, 2025 3:18 PM

views 25

गुजरातमधे आज होत आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन आज गुजरातमधे साबरमती नदीच्या काठावर होत आहे. तिरस्कार, नकारात्मकता आणि निराशेचं वातावरण बदलून न्याय आणि संघर्षाच्या मार्गाने जाण्याचा निर्धार महासचिव सचिन पायलट यांनी व्यक्त केला. महात्मा गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपद स्वीकरल्याला १०० वर्षं पूर्ण होत असून सरदार वल्लभभाई पटेल यांचं शतकोत्तर सुवर्णजयंती वर्ष असल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला. काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक काल गुजरातमध्ये अहमदाबाद इथं झाली.  

November 11, 2024 2:26 PM

views 8

श्री स्वामीनारायण मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला प्रधानमंत्र्यांनी केलं संबोधित

भारतीय तरुणांच्या क्षमतेकडे संपूर्ण जगाचं लक्ष असून जागतिक नेत्यांना भारतीय तरुणांनी त्यांच्या देशात काम करण्याची अपेक्षा असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. गुजरातमधे वडताल इथं श्री स्वामीनारायण मंदिराच्या २००व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला त्यांनी आज सकाळी दूरदृश्य माध्यमाद्वारे संबोधित केलं. कुशल मनुष्यबळ असलेल्या भारतीय तरुणांची जागतिक मागणी आणखी वाढणार असून विकसित भारतासाठी तरुणांना सशक्त केलं पाहिजे, असं त्यांनी यावेळी म्हटलं. यावेळी सरकारनं २०० रुपयां...

August 30, 2024 1:51 PM

views 12

अरबी समुद्रात असना चक्रीवादळाची चाहूल

अरबी समुद्रात ईशान्येकडे 'असना' हे चक्रीवादळ तयार होत आहे, सध्या निर्माण झालेलं कमी दाबाचे क्षेत्र गुजरातच्या पश्चिम-नैऋत्य दिशेला दाखल झालं असून, येत्या १२ तासांमध्ये त्याचं चक्रीवादळात रूपांतर होईल, अशी शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागानं वर्तवली आहे. मान्सूनमध्ये चक्रीवादळ तयार होणं ही दुर्मीळ बाब असून, याआधी १९६४ साली ऑगस्ट महिन्यात अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार झालं होतं. सुरुवातीला हे चक्रीवादळ पश्चिम-नैऋत्येकडे आणि त्यानंतर कच्छ किनाऱ्याकडे सरकेल. कच्छच्या किनाऱ्यावरून हे चक्रीवादळ ईशान्...