August 24, 2024 2:55 PM August 24, 2024 2:55 PM

views 24

गाझा मध्ये पोलिओ चा उद्रेक होण्याची चिंता व्यक्त केली

यूनायटेड नेशन्स रिलीफ अँड वर्क्स एजन्सी या पॅलेस्टाईन निर्वासितांसाठी काम करणाऱ्या संघटनेनं गाझा मध्ये पोलिओ चा उद्रेक होण्याची चिंता व्यक्त केली आहे. पोलिओ लसीचा अपुरा पुरवठा आणि शीत साखळीचा अभाव यामुळे तिथल्या बालकांमध्ये रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. महिना अखेरीस गाझा मधल्या १० वर्षां आतील ६ लाख ४० हजारांहून अधिक बालकांसाठी २ टप्प्यात लसीकरण मोहीम राबवण्यात येईल अशी माहिती संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस एंटोनिओ गुटेरस यांनी दिली.

July 4, 2024 1:42 PM July 4, 2024 1:42 PM

views 16

गाझा पट्टीत युद्धसमाप्तीच्या उद्देशाने हमासची इजिप्त आणि कतारच्या मध्यस्थांशी सल्लामसलत

गाझा पट्टीत इस्राएलबरोबरचं युद्ध संपवण्याच्या दृष्टीनं कतार आणि इजिप्तच्या मध्यस्थांसोबत सल्लामसलत केल्याचं हमासनं म्हटलं आहे. हमासचा प्रतिसाद मध्यस्थांमार्फत पोहोचल्याच्या वृत्ताला इस्राएलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी दुजोरा दिला आहे. या प्रतिसादाचा अभ्यास करून इस्राएल निर्णय घेईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.