February 3, 2025 2:44 PM February 3, 2025 2:44 PM
9
महाकुंभमेळ्यातल्या चेंगराचेंगरीत अनेक जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेवरुन आज संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ
उत्तरप्रदेशात प्रयागराज इथं महाकुंभमेळाव्यात झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेवरुन आज संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे प्रचंड गदारोळ झाला. महाकुंभ व्यवस्थापनात ढिसाळपणा झाल्याचा आरोप करत लोकसभेत विरोधी पक्ष सदस्यांनी घोषणाबाजी केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अभिभाषणात या दुर्दैवी घटनेचा उल्लेख केला होता. अभिभाषणाबद्दल आभारप्रस्तावावरच्या चर्चेदरम्यान सदस्यांना आपलं म्हणणं मांडता येईल असं सभापती ओम बिरला यांनी सांगितलं. त्यानंतर लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलच्या ...