April 15, 2025 8:50 AM April 15, 2025 8:50 AM

views 12

शरण आलेल्या नक्षल्यांसाठी गडचिरोलीमध्ये ‘प्रोजेक्ट संजीवनी’ची सुरुवात

गडचिरोली पोलिसांनी राबविलेल्या विविध लोकोपयोगी उपक्रमांमुळे प्रभावीत होऊन शरण आलेल्या नक्षल्यांसाठी पोलिसांनी 'प्रोजेक्ट संजीवनी' हा नवा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमांतर्गत शरण आलेल्या नक्षल्यांना हक्काचं निवासस्थान मिळावं यासाठी चार रो-हाऊसेस तयार करण्यात येणार आहेत; त्याचं भूमिपूजन पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते काल झालं. राज्य शासनाने २००५ पासून नक्षल्यांसाठी आत्मसमर्पण योजना सुरु केली. ही योजना आणि गडचिरोली पोलिसांनी राबविलेले लोकोपयोगी उपक्रम बघून आतापर्यंत ७०४ नक्षल्यांनी पोलिसांप...

December 5, 2024 10:05 AM December 5, 2024 10:05 AM

views 13

चंद्रपूर, गडचिरोली तसंच नागपूर जिल्ह्याला जाणवले भूकंपाचे तीव्र धक्के

चंद्रपूर, गडचिरोली तसंच नागपूर जिल्ह्यात काल सकाळी साडेसातच्या सुमारास भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 5 पूर्णांक 3 रिख्टर होती आणि तेलंगण राज्यातील मुलुगु इथं या भुकंपाचा केंद्रबिंदू होता, असं राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानं जाहीर केलं आहे. या भूकंपाच्या धक्क्यांमुळं कोणतीही जिवित वा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही.

October 18, 2024 7:23 PM October 18, 2024 7:23 PM

views 9

गडचिरोली जिल्ह्यातल्या गोंडवाना विद्यापीठाला फिक्कीचा ‘संस्थात्मक सामाजिक उत्तरदायित्व राष्ट्रीय पुरस्कार

गडचिरोली जिल्ह्यातल्या गोंडवाना विद्यापिठाला फिक्कीच्या संस्थात्मक सामाजिक उत्तरदायित्व या राष्ट्रीय पुरस्कारानं तर महात्मा फुले कृषि विद्यापीठाला फिक्कीच्या सर्वोकृष्ट विद्यापीठ या पुरस्कारानं सन्मानीत करण्यात आलं. दिल्लीत आज झालेल्या १९ व्या 'फिक्की हायर एज्युकेशन समिट २०२४' या कार्यक्रमात भारतातल्या ब्रिटिश सरकारच्या उच्चायुक्त लिंडा कॅमरून यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.  ग्रामसभा सक्षमीकरणासाठी केलेल्या कार्याची दखल घेत गोंडवाना विद्यापीठाला हा पुरस्कार देण्यात आला आहे. महात्म...

September 24, 2024 7:02 PM September 24, 2024 7:02 PM

views 23

गडचिरोलीत पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत ३ नक्षलवादी ठार

गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेजवळ छत्तीसगड राज्यातल्या नारायणपूर जिल्ह्यात काल झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले. यात दंडकारण्य झोनल समितीचा सदस्य रुपेश मडावी याचा समावेश आहे. तो मागच्या वीस वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात सक्रिय होता. हत्या, जाळपोळ करणं असे ६६ गुन्हे त्याच्यावर दाखल होते. लोकसभा निवडणुकीवेळी भामरागड तालुक्यातल्या कोठी इथल्या मतदान केंद्रावर हल्ला करण्यात रुपेश मडावी याचा सहभाग होता असं पोलीस अधिक्षक नीलोत्पल यांनी सांगितलं.

July 28, 2024 7:20 PM July 28, 2024 7:20 PM

views 16

गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पावसामुळे ४० मार्गांवरची वाहतूक ठप्प

    गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पावसामुळे आज जनजीवन विस्कळीत झालं. पुरामुळे गडचिरोली-चार्मोशी आणि आलापल्ली-भामरागड या मार्गांसह जिल्ह्यातल्या चाळीस मार्गांवरची वाहतूक ठप्प झाली. धानोरा तालुक्यात गेल्या चोवीस तासांत सर्वाधिक १५४ पूर्णांक २ दशांश मिलिमीटर पावसांची नोंद झाली. गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत १६२ पूर्णांक ९ दशांश टक्के पाऊस झाल्याचं वेधशाळेनं कळवलं आहे. हेमलकसा - भामरागड दरम्यान आलेल्या पुरात अडकलेल्या ३५ नागरिक आणि तीन मुलांना काल एसडीआरएफ आणि महसूल विभागाच्या पथकानं सुखरूप बाहेर काढलं. ...

July 27, 2024 6:21 PM July 27, 2024 6:21 PM

views 11

८ लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल महिलेचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण

आठ लाखांचं बक्षीस असलेल्या एका महिला नक्षलीनं आज गडचिरोलीमध्ये आत्मसमर्पण केलं. तिच्यावर चकमक आणि हत्या असे दोन गुन्हे दाखल आहेत. रिना नरोटे असं तिचं नाव असून ती भामरागड तालुक्यातल्या बोटनफुंडी इथली रहिवासी आहे. २००६ मध्ये ती नक्षलवाद्यांच्या पेरमिली दलमची सदस्य झाली होती.  आत्मसमर्पण योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत ६७१ नक्षल्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केल्याचं पोलीस अधिक्षक निलोत्पल यांनी सांगितलं.

June 27, 2024 6:56 PM June 27, 2024 6:56 PM

views 10

दोन नक्षलवादी महिलांचं गडचिरोली इथं पोलिसांसमोर आत्मसमर्पण

दोन नक्षलवादी महिलांनी आज गडचिरोली इथं पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. अनेक गुन्ह्यांची नोंद असलेल्या या दोघींवर प्रत्येकी ८ लाख रुपयांचं बक्षीस होतं. २०२२ पासून आतापर्यंत १९ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, नक्षलवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून आत्मसमर्पण करावं आणि  स्वाभिमानाचं  जीवन जगावं , असं  आवाहन पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी केलं  आहे.

June 23, 2024 12:59 PM June 23, 2024 12:59 PM

views 22

नक्षल नेता गिरीधरचे पत्नी संगीतासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण

गडचिरोली जिल्ह्यातल्या नक्षल चळवळीतील राजकीय आणि लष्करी हालचालींचा प्रभारी आणि वरिष्ठ नक्षल नेता नांगसू मनकू तुमरेटी उर्फ गिरीधर उर्फ बिच्चू यानं पत्नी संगीतासह ; गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल शरणागती पत्करली. गिरीधरवर १७९ गुन्ह्यांची नोंद आहे. त्यात ८६ चकमकी आणि १५ जाळपोळीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र शासनान त्याला पकडण्यासाठी २५ लाख रुपये बक्षीस जाहीर केलं होतं. नक्षलवाद्यांचा संविधानावर विश्वास नाही. ते हिंसेवर विश्वास ठेवून निरपराध नागरिकांचा बळी घेतात. त्यामुळे आ...