August 27, 2024 6:59 PM August 27, 2024 6:59 PM
10
आशा कर्मचाऱ्यांचा कर्तव्यावर असताना अपघाती मृत्यू किंवा अंपगत्वाबद्दल सानुग्रह अनुदानाबाबत शासन आदेश जारी
आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांच्या कामाचं स्वरुप लक्षात घेऊन त्यांना कर्तव्य बजावताना मृत्यू आला तर १० लाख रुपये आणि कायमस्वरुपी अपंगत्व आलं तर ५ लाख रुपयांचं सानुग्रह अनुदान लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या संदर्भात राज्य शासनाने आदेश जारी केले असून १ एप्रिल २०२४ पासून हा निर्णय लागू करण्यास मान्यता दिली आहे. यासाठी प्रत्येक वर्षाला १ कोटी ५ लाख इतका आवर्ती निधी मंजूर करण्यात आला आहे.