August 26, 2024 8:14 PM August 26, 2024 8:14 PM

views 29

२७व्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद २०२४ चं आयोजन

केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयासह प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी विभाग तसंच, राज्य शासनाचा प्रशासकीय नाविन्यता, उत्कृष्टता आणि सुशासन उपविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने २७व्या राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद २०२४चं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या परिषदेचं ३ सप्टेंबर रोजी मुंबईत उद्घाटन होईल. या परिषदेचं यजमानपद यंदा महाराष्ट्राकडे आहे. विकसित भारत - सुरक्षित आणि शाश्वत ई सेवा पुरवठा हा या परिषदेचा विषय आहे. या परिषदेला राज्यमंत...