October 2, 2024 3:53 PM October 2, 2024 3:53 PM
11
खो-खो या देशी खेळाची पहिली विश्वचषक स्पर्धा पुढच्या वर्षी भारतात होणार
खो-खो या देशी खेळाची पहिली विश्वचषक स्पर्धा पुढच्या वर्षी भारतात होईल, असं भारतीय खो- खो महासंघ आणि आंतरराष्ट्रीय खो-खो महासंघानं आज जाहीर केलं. ५४ देशांमध्ये हा खेळ खेळला जातो, या स्पर्धेत मात्र ६ खंडातले २४ देशांतले १६ पुरुष संघ आणि तितकेच महिला संघ सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा आठवडाभर चालेल. या स्पर्धेमुळे या खेळाला असलेल्या समृद्ध वारशाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जाणार आहे. आधी मातीत खेळला जाणारा हा खेळ आता मॅटवर खेळला जातो. या स्पर्धेच्या निमित्तानं भारतीय महासंघ १० शहरांमधल्या २०...